*जे. जे.मगदूम अभियांत्रिकीच्या ६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड *
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ०६ विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांमध्ये झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी.माळगे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी केले. मा. व्यवस्थापन व कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयामध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सुरू असून, बेसिक एज्युकेशन व ट्रेनिंग याचीच ही फलश्रुती आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील नमूद केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सिव्हिल विभागाचे जुवेरिया रफिक मुजावर व मानसी सुधाकर पोळ यांची निवड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीमध्ये झाली आहे. अमृता विजयकुमार पाटील कंप्यूटर इंजिनिअरिंग विभाग, हिची निवड टेक महिंद्रा लिमिटेड मध्ये झाली तर आयटी डिपार्टमेंटचे यशोदा तुकाराम कोळपे बीव्हीजी इंडिया ग्रुप मध्ये निवड झाली असून झोर गुपिया लियानऊग याची निवड इंडियन प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे झाली. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचा मनोज बसवराज चिकोडे या विद्यार्थ्यांची निवड विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये ३.८७ लाख रु. वार्षिक पॅकेज वरती झालीआहे .
लिखित परीक्षा, इंटरव्यू, ग्रुप डिस्कशन व कोडींग या सर्व गोष्टींचा सामना करून ह्या विद्यार्थ्यांची झालेली निवड खरोखरच प्रशंसनीय आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख, व
प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
जे. जे.मगदूम अभियांत्रिकीच्या ६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड *
