सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर नेमणूक होण्यासाठी आणि तोपर्यंत या कर्मचाऱ्याना समान कामाला समान वेतन मिळण्यासाठी ९ एप्रील पासून आंदोलन करणार!

सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर नेमणूक होण्यासाठी आणि तोपर्यंत या कर्मचाऱ्याना समान कामाला समान वेतन मिळण्यासाठी ९ एप्रील पासून आंदोलन करणार!

सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर नेमणूक होण्यासाठी आणि तोपर्यंत या कर्मचाऱ्याना समान कामाला समान वेतन मिळण्यासाठी ९ एप्रील पासून आंदोलन करणार!
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 40 संस्था नियुक्त शिक्षकेतर कर्मचारी मागील पंधरा वर्षापासून सलगपणे आजपर्यंत ते काम करीत आलेले आहेत. त्यांचे शिक्षणही इंजिनीयर पर्यंत असून ते कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. तरीही मागील अनेक वर्षापासून या कर्मचाऱ्यांना फक्त दरमहा पंधरा हजार रुपये वेतनावर राबवून घेतले जात आहे.या विरुद्ध अनेक वेळा तक्रारी करूनही महाविद्यालयाच्या व्यवस्थापकानी त्यांच्या पगारांमध्ये वाढ केली नाही. म्हणून या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियनचे या कर्मचाऱ्यांनी सभासद होऊन संघर्षाला सुरुवात केलेली आहे.
विशेष आश्चर्य म्हणजे या 40 वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची रिक्त पदावर नेमणूक करावी असा प्रस्ताव या महाविद्यालयामार्फत शासनाच्या उच्च शिक्षण विभाग कडे पाठवून दिलेला आहे.
परंतु ज्यांची रिक्त पदावर काम करण्याची पात्रता आहे त्यांचा हा अधिकार काढून घेण्यासाठी कॉलेजच्या व्यवस्थापक मार्फत सध्या कारस्थान सुरू केलेले आहे.
संस्था नियुक्त कर्मचाऱ्यांना डावलून जे नव्याने केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना मात्र एक मार्च 2024 पासून 35 हजार रुपये पगार देण्यास सुरुवात करून या संस्था नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वर दबाव आणला जात आहे की तुम्ही सुद्धा कायम नोकरीचा हक्क सोडून द्या तुम्हालाही 35 हजार रुपये दरमहा पगार देतो असे आमिष दाखवले देत जात आहे. या अन्यायाविरुद्ध सर्व कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन सांगली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे ता.26 मार्च 2024 रोजी तक्रार केलेली आहे.
सांगली सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांच्याकडे किमान वेतन कायदा खाली मागील पगाराचे फरक मिळण्यासाठीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे .
या कॉलेजमधील कंत्राटी व संस्थानियुक्त कर्मचाऱ्यांची सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी सरकारी अधिकारी यांनी तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली असून अशी तपासणी करण्यात येईल असे कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळास सांगलीचे सहायक कामगार आहेत श्री मुजावर यांनी आश्वासन दिले आहे.
दरम्यान कॉलेज मार्फत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास नऊ मार्चपासून तीव्र आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल असे कामगारांच्या बैठकीमध्ये युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी यांनी घोषित केले आहे.
शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी यांचे सह शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी सुरेंद्र अंबी,संजय मगदूम,संजय भंडगे, प्रविण व्हनकडे, किरण पाटील,रोहीत कोळी, अतिश साठे, व्यंकटेश तुपदळे, दिलीप कोळेकर,राजू वडेर. विनोद भंडार. गणेश कुंभार इत्यादींचा समावेश होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *