डॉ. विजय मगदूम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्याचे आयोजन.
जयसिंगपूर येथील डॉ. जे जे मगदूम ट्रस्ट कडून, ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांचा वाढदिवस २२ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली. प्रति वर्षाप्रमाणे मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमांना फळे व धान्य वाटप इत्यादी अनेक उपक्रमानी डॉक्टर विजय मगदूम यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
१९७२ साली कै.डॉ. जे. जे. मगदूम व त्यांच्या पत्नी कै. प्रभावती मगदूम यांनी डॉ. जे. जे. मगदूम यांच्या नावे एक शैक्षणिक संकुल उभा केले.२०१२ नतंर त्यांच्या पश्चात हे ट्रस्ट चांगले व गुणवत्ता पूर्ण चालवण्यासाठी डॉ. विजय मगदूम व त्यांच्या पत्नी डॉ.सोनाली मगदूम अहोरात्र कष्ट घेत आहेत. ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्था नॅक मानांकित करणे, आय. एस. ओ.सर्टिफाईड करणे व अभियांत्रिकी महाविद्यालया सोबतच सर्व संस्थांना स्वायत्त दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्यास त्यांच्या जन्मदिनी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्याचे ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयीन प्राचार्यांनी ठरविले आहे.प्राचार्या, जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, प्राचार्य, नर्सिंग कॉलेज, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, बी. फार्मसी व डी. फार्मसी कॉलेज, पिंटू उर्फ अनिल मगदूम डी. फार्मसी कॉलेज, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल, जे. जे.मगदूम जुनियर कॉलेज यासह ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्थानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Posted inकोल्हापूर
डॉ. विजय मगदूम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्याचे आयोजन.
