जयसिंगपुर : मंगल रमेश गायकवाड राहणार राजापूर वाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हिचा खून केले बद्दल आरोपी रमेश गणपती गायकवाड राहणार राजापूर वाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास सरकारी वकील उदय कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राहय धरून जयसिंगपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली . या खटल्याबाबत पार्श्वभूमी अशी की दिनांक 23 3 2019 रोजी राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे चार वाजता तालुका राजापूर वाडी बस स्टॉप जवळ वडाचे झाडाखाली सदरची घटना घडली आहे राजापूर वाडी येथील आरोपी रमेश गणपती गायकवाड वय वर्षे 49 यांनी त्याची पत्नी सौ मंगल रमेश गायकवाड राहणार राजापूर वाडी कुरुंदवाड यांचेत वारंवार वादाचा राग मनात धरून चिडून जाऊन आरोपीने मयत मंगल हिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला आहे. म्हणून त्याचे विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 69/ 2019 भारतीय दंड संहिता कलम 302 प्रमाणे तपास करून तपासी अधिकारी श्री ए बी शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुरुंदवाड यांनी दोषारोपपत्र सन 2019 आली दाखल केले होते. सदरचा गुन्हा दिनांक 23 मार्च 2019 रोजी नोंद झाला होता. सदरचा खटला हा जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरव सो यांचे समोर चालू होता. सदर खटल्याची सुनावणी दिनांक 07/02 2023 रोजी सुरू झाली व ती आज दिनांक 06/04 2024 रोजी संपली. सदर कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सरकारी वकील श्री उदय कुलकर्णी यांनी काम पाहिले त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासणी त्यामध्ये पंच विजय एकसंबे रोहित ढाले सुरेश पाटील दीपक एकसंबे वाल्मिकी कोळी अनिल सुतार यांच्या साक्षी घेण्यात आल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा चव्हाण यांची साक्ष घेण्यात आली व तो वैद्यकीय पुरावा महत्त्वपूर्ण ठरला आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो स्वतः कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्यामुळे त्यांनी स्वतः हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती व त्याची नोंद पोलीस नाईक पीबी केदार यांनी ठाणा डायरीत घेतली त्यांची साक्षी महत्त्वाची ठरली. सदर संपूर्ण गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री ए बी शिंदे यांनी करून दोषारोप पत्र दाखल केले होते त्यांचीही साक्ष महत्त्वाची ठरली सदर कामी एकूण झालेल्या 14 साक्षीदारांचा पुरावा तसेच अन्य कागदोपत्री पुरावा सरकारी वकील उदय कुलकर्णी यांचा झालेला युक्तिवाद माननीय कोर्टाने ग्राह्य धरला तो ग्राह्य म्हणून माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर श्री जी बी गुरव सो यांनी आरोपी भारतीय दंड संहिता कलम 302 प्रमाणे मंगल गायकवाड यांचा खून केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच 10000 रुपये चा दंड केला. अशी शिक्षा माननीय न्यायालयाने आरोपीस ठोठावली याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे कडील अधिकारी व कर्मचारी आणि विशेष प्रयत्न केले. संपूर्ण केसचे कामे श्री हनुमंत बंडगर पोलीस कॉन्स्टेबल कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी साक्षीदार हजर ठेवणे बाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकीलना मदत केली सदरच्या शिक्षेमुळे आरोपींचे वचक बसत आहे.