
व्हिएतनाम देश म्हणजे जगामध्ये कामगार वर्गाची सत्ता असलेला सत्तर वर्षांपासून जगातील एक महत्वपूर्ण देश आहे.
या देशातील कामगार वर्गाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी फ्रेंच साम्राज्यवादी अमेरिकन साम्राज्यवादाने 1955 सालापासून व्हिएतनाम देशावर युद्ध लादले. अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी व्हिएतनाम देशावर दुसऱ्या महायुद्धामध्ये जगात जेवढे बॉम्ब टाकलेले नव्हते त्याच्यापेक्षा जास्त बॉम्ब टाकले.
तरीही या वीस वर्ष सलग सुरू असलेल्या युद्धामध्ये व्हिएतनाम लढाऊ जनतेने फ्रेंच साम्राज्यवादी व अमेरिकन साम्राज्यवाद यांचा पूर्ण पराभव केला. जगातील कामगार वर्गाच्या दृष्टीने ही नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिलेली आहे.
जगामध्ये व भारतामध्ये 1960 ते 75 सालच्या दरम्यान एक महत्त्वाची जगामध्ये घोषणा होती ती म्हणजे हमारा नाम तुम्हारे व्हिएतनाम असा एकमेव देश आहे की वीस वर्षे अमेरिकेने त्यांच्याबरोबर युद्ध केल्यानंतर शेवटी अमेरिकेला दारूण पराभव पत्करून या चिमुकल्या देशातून पळून जावे लागले.
