गृहनिर्माण क्षैत्रात होणार वाढ; किंमत व विक्री यामध्ये होणार वाढ!

गृहनिर्माण क्षैत्रात होणार वाढ;  किंमत व विक्री यामध्ये होणार वाढ!

गृहनिर्माण क्षैत्रात होणार वाढ

किंमत व विक्री यामध्ये होणार वाढ!

(विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी गृहनिर्माण क्षैत्रात घेतलेला आढावा)

(राज्य सरकार घेणार सकारात्मक धोरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार प्रविण दरेकर, पियुष गोयल यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण व सहकार चळवळीचा मेळावा संपन्न)

एप्रिल व मे महिन्यात घर खरेदी व विक्री जोरदार प्रमाणात होते. अनेक ठिकाणी घरांचे पुर्नविकास होत असल्याने भांड्याच्या घरालाही जबरदस्त मागणी वाढली आहे यामुळे सर्वच घरातील किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. एकीकडे घरांच्या किंमती मध्ये वाढ झाली असली तरी गृहनिर्माण क्षैत्रात घर विक्रीच्या प्रमाणातही बरकत आल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या तिमाहीत म्हणजे या वर्षी जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांच्या विक्रीत 51 टक्क्यांची वाढ झालीय. तर 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. सुलभ मिळणारे गृहकर्ज व राहणीमानात सुधारणा यामुळे मोठ्या घरांकडे लोकांचा कल वाढतो आहे.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आठ शहरांमध्येच 86,345 घरांची विक्री झालीय. त्यापैकी, 23,743 घरांची विक्री एकट्या मुंबईत झालीय. ही विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजे घर विक्रीच्या बाबतीत मुंबई शहर सर्व शहरांपेक्षा आघाडीवर आहे. दरम्यान, आठ शहरांमध्ये विक्री झालेल्या 86,345 घरांपैकी 40 टक्के घरं ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. विक्री झालेल्या एकूण घरांपैकी 34,895 घरांची किंमत ही 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती असं अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र, दुसरीकडे 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत 10 टक्क्यांची घट झालीय. घरांच्या वाढत्या किंमती आणि महागडी कर्ज यामुळं 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या घरांच्या विक्रीत घट झालीय.
कोणत्या शहरात कित्ती टक्क्यांनी महाग झाली घरं?

मुंबई – 6 टक्क्यांची वाढ
बंगळुरु – 9 टक्क्यांची वाढ
एनसीआर – 5 टक्क्यांची वाढ
कोलकाता – 7 टक्क्यांची वाढ
पुणे – 4 टक्क्यांची वाढ
चेन्नई – 5 टक्क्यांची वाढ

घरांच्या किंमती मध्ये वाढ झाली आहे. परंतु नैसर्गिक रित्या जमीनीमध्ये वाढ होऊ शकत नाही यामुळेच पुर्नविकास प्रकियेला गती आली आहे. आमदार प्रविण दरेकर यांनी नुकताच मुंबई मध्ये शहरातील पुर्नविकास प्रकियेला गती देण्यासाठी उपनगरात मेळावा आयोजित केला होता व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा शहरातील पुर्नविकासाला सकारात्मक प्रतिसाद देऊन विकास कामांना चालना देण्याचे सुतोवाच केलेले आहे. बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य विकासक जय मोर्झरिया यांच्या मते राज्य शासन, विकासक व सोसायटीच्या समन्वयातून विकास कामाला लवकरच चालना मिळेल. पुर्नविकासा मध्ये प्रिमियम चार्जेस, मासिक भाडे, कार्पस फंड, ब्रोकरेज,आर्किटेक्ट प्लॅन विविध प्रकारचे परवाने, जाहिरात व रेरा नियमांचे पालन यामुळे नफ्यातील प्रमाणात घट झाल्याचे अनेक विकासचे मत आहे. व्यवसाय म्हटला तर स्पर्धा व आर्थिकदृष्टय़ा चढ-उतार असतातच असे विकासकांची मत आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक विभागात टीडीआर मध्ये वाढ झाल्याने घरांच्या किमती मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे व ती या पुढे अधिक होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, मनुष्याच्या दरातील व वाहतूक खर्च वाढीमुळे विकासकांनाी फटका बसला आहे. गृहनिर्माण क्षैत्रात झालेली स्पर्धा मोठ मोठे उद्योगपतीचे गृहनिर्माण क्षैत्रातील पदार्पण यामुळे शहरातील अनेक भागात इमारतींचे झाले निर्माण झाले आहे.

मुंबई रिअल इस्टेट मध्ये टीडीआरमुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे
स्लम टीडीआर दरांमध्ये तीव्र वाढ झाल्याने मुंबईचे रिॲल्टी मार्केट त्रस्त आहे. मुलुंडमधील टीडीआर सहा महिन्यांपूर्वी ₹3,500 प्रति चौरस फूट होता तो सध्या ₹6,000 वर पोहोचला आहे.
मुंबई: रिअल इस्टेट बाजार झोपडपट्टीच्या टीडीआर दरांमध्ये तीव्र वाढीमुळे त्रस्त आहे,ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट्स व्यस्त प्रमाणामुळे नफ्यावर परिणाम होत आहे आणि चालू प्रकल्पांच्या बांधकामाची वेळ टॉससाठी पाठवली जात आहे. उद्योग अधिकाऱ्यांच्या मते, मुलुंडमधील टीडीआर सहा महिन्यांपूर्वी ₹ 3,500 प्रति चौरस फूट होता तो सध्या ₹ 6,000 वर पोहोचला आहे. बोरिवलीमध्ये गेल्या सहा महिन्यांत हा दर ₹ 3,000 प्रति चौरस फूट वरून ₹ 5,700 इतका वाढला आहे.

रिअल इस्टेट मार्केट सध्या गोंधळात आहे. बांधकाम खर्च वाढत आहेत, प्रकल्पांच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे आणि रिअल इस्टेट कायदा किंवा RERA मुदतीची पूर्तता करणे बिल्डर्ससाठी कठीण होत आहे. ग्राहक जागरूक झालेला आहे. बांधकाम क्षैत्रातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. असे असले तरी गृहनिर्माण क्षैत्रात गोंधळाचे वातावरण आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *