रोटरी प्रोबस क्लबची डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्स यशस्वी.
इचलकरंजी
रोटरी प्रोबस डिस्ट्रीक्ट क्लबची 2023-24 ची कॉन्फरन्स इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कॉन्फरन्सचे आयोजन रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले होते. येथील महेश सेवा समिती कार्यालयात संपन्न कॉन्फरन्सचे उदघाटन डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला, पीडीजी महेंद्र मुथा, 2024-25 चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शरद पै (बेळगावी) यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. अध्यक्षस्थानी 2025-26 चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अरूण भंडारे हे होते. कॉन्फरन्सच्या सुरुवातीला महिला सदस्यांनी स्वागतगीत सादर केले.
स्वागत इचलकरंजी रोटरी प्रोबसचे विद्यमान अध्यक्ष शिवबसू खोत यांनी तर प्रास्ताविक कॉन्फरन्स कमिटीचे चेअरमन एम. के. कांबळे यांनी केले. संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रीक्ट चेअरमन प्रकाशराव सातपुते यांनी, इचलकरंजी रोटरी प्रोबसच्या कार्याचा आढावा घेतला. रोटरी प्रोबस हा क्लब आनंदी जीवन जगण्यासाठी, समाजाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी, त्यांच्यात ऊर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम, चर्चासत्रे, व्याख्याने व मनोरंजन या माध्यमातून सातत्याने कार्य करत असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी नासिर बोरसादवाला यांनी, रोटरी प्रोबसच्या कार्याचे कौतुक करत ज्येष्ठांचे जीवन आनंदमय करत असून त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच कुटुंबव्यवस्था बळकट झाली पाहिजे, यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. उद्घाटनानंतर दुसर्या सत्रात छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी, पर्यावरणाचा जगाला भविष्यात होणारा धोका व बदलते हवामान या विषयावर सविस्तर मांडणी केली. योळी प्रोबसच्या सदस्यानी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन अरूण केटकाळे व जुगलकिशोर यांनी केले होते. यावेळी महिला व पुरुषांनी विविध प्रकारची गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
तिसर्या सत्रात महिला सबलीकरण विषयावर इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती मौसमी चौगुले यांनी मांडणी करताना महिलांचे समाजातील आणि कुटुंबातील स्थान, त्यांना दिली जाणारी वागणूक, महिलांचे शोषण याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतरच्या सत्रात छ. शिवाजी विद्यापीठाचे एक्झिक्युटीव्ह रजिस्ट्रार बी. एम. हिर्डेकर यांनी, ज्येष्ठांची समृध्द संपन्न जीवनशैली या विषयावर विविध उदाहरणांसहीत विचार मांडले. जगभर आणि भारतातही सर्वाचे माणसांचे आयुर्मान वाढले असून एका विशिष्ट वयानंतर निवृत्ती घेणे ही मानसिकता बदलायला पाहिजे. तुम्ही नोकरीतून निवृत्त होता म्हणजे आयुष्यातून नाही हे लक्षात घ्याव्यात अशा अनेक सुचना त्यांनी ज्येष्ठांना दिल्या.
समारोपाच्या सत्रात इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी, रोटरी प्रोबसच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी इचलकरंजी महापालिका प्रोबस क्लबला सहकार्य करेल असे आश्वासन देत ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा फायदा महापालिकेच्या कामासंबंधी सुचना मार्गदर्शन करावे, अशी आशा व्यक्त केली.
या कॉन्फरन्ससाठी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, अध्यक्ष शिवबसू खोत कॉन्फरन्स चेअरमन एम. के. कांबळे, उपाध्यक्ष सुनिल कोष्टी, सेक्रेटरी विजय पोवार, सौ. अरूंधती सातपुते, सौ. जयश्री दत्तवाडे, सौ. सुजाता कोईक, सौ. हेमल सुलतानपुरे, सौ. प्रमोदिनी देशपांडे, सौ. प्राजक्ता होगाडे यांच्याबरोबरच विविध कमिट्यांचे चेअरमन व को-चेअरमन अॅड. विश्वास चुडमुंगे, रामचंद्र निमणकर, मोहनराव भिडे, प्रकाश दत्तवाडे, सुर्यकांत बिडकर, अरूण केटकाळे, डी. एम. बिरादार, काशिनाथ जगदाळे, अजित कोईक, गजाननराव सुलतानपुरे, गजानन खेतमर, विलास पाडळे उपस्थित होते. मान्यवरांची ओळख व सत्कार अनुक्रमे किरण कटके, राजन मुठाणे रमेश मर्दा, जयप्रकाश शाळगावकर, कुमार माणकापुरे यांनी केले. आभार सुनिल कोष्टी यांन मानले. सूत्रसंचालन शारदा कवठे व सायली बंब यांनी केले. यावेळी इचलकरंजी रोटरी परिवारातील विविध मान्यवर तसेच विठ्ठलराव डाके, धोंडिराम कस्तुरे, रविंद्र सौंदत्तीकर डि. बी. टारे, राजाराम बोंगार्डे, कोल्हापूर प्रोबस क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत लोले, महावीर कुरूंदवाडे, वैभव डोंगरे, गजानन शिरगुरे, आप्पासाहेब कुडचे, अशोक देगांवकर, बाळासाहेब रुईकर, धनपाल बिंदगी, दिलीप शेट्टी, कुबेर मगदूम, डॉ. प्रकाश पाटील, सुरेश काबरा, मनोहर कुराडे, प्रदिप लडगे, प्रकाश अकिवाटे, सुनिल परीट, वर्षा कुलकर्णी, विजय हावळ, डॉ. ए. के. चौगुले, डॉ. सांगावे, विजय बनसोडे आदीसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ठिकाणचे विविध क्लबचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
रोटरी प्रोबस क्लबची डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्स यशस्वी.
