चोकाक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती उत्साहात साजरी
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे साऱ्या जगाला मानवता आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती अगदी उत्साहात संपन्न झाली यावेळी सुरुवात भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन गावचे लोकनियुक्त सरपंच श्री सुनिल चोकाककर व उपसरपंच शितल राजू ननवरे यांच्या हस्ते तसेच ध्वजारोहण बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिक चांदू कांबळे यांच्या हस्ते केले तसेच उपस्थितांची मनोगत मांडली त्यामध्ये कोल्हापूर बौद्ध महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री अशोक चोकाककर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितांसमोर बौध्द अनुयायी कसा असावा तसेच त्री सरण पंचशील याचे महत्त्व पटवून देत उपस्थितांची वाहवा मिळवली त्यानंतर गौतम बुद्ध यांच्या जयंतनिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले सदर शिबिर वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व समस्त बौद्ध समाज चोकाक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले यावेळी सुमारे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रवीण माने यांनी केले यावेळी बौद्ध समाज नूतन अध्यक्ष श्री प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ चव्हाण, खजिनदार अभिजीत माळगे सर्व पदाधिकारी सदस्य, सरपंच सुनिल चोकाककर, उपसरपंच शितल राजू ननवरे, ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे, यांच्यासह बंटी (योगेश चोकाककर) प्रवीण माने, राघू नाना कांबळे, रघुनाथ चव्हाण, कुमार ढाले, दिनकर शिंदे, तसेच महिला वर्ग मनिकमाला चव्हाण, राजश्री कांबळे, कोल्हापूर जिल्हा बौद्ध महासंघ अध्यक्ष श्री अशोक चोकाककर, ज्येष्ठ नागरिक चांदु कांबळे, दिगंबर कांबळे सर युवा कार्यकर्ते बापू कांबळे (सुशांत), सुभाष माने , श्री शिवागोंडा चोकाककर, उत्तम कुरणे मुकुंद कांबळे, संतोष कांबळे, श्री संजय कांबळे,यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर बुद्ध विहारात समूह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सामूहिक बौद्ध वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.