हातकणंगले येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गातील रस्त्याची दुरवस्था
हातकणंगले येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गातील रस्त्याची दुरवस्था ही या इंडस्ट्री कडे येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक घटकाची डोकेदुखी ठरत आहे कारखानदार असतील व या कारखान्यात कामाला जाणारे कामगार असतील तसेच वाहनधारक यांना यातून तारेवरची कसरत करावी लागत आहे सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहनधारक व जाणारे येणारे पादचारी यांच्यातून होत आहे या मागणीकडे शासन केंव्हा लक्ष देऊन सदर रस्त्याचे काम मुरुमीकरण किंवा डांबरीकरण कधी होईल या चिंतेने सर्व वाहनधारक आसुसलेले दिसून येत आहेत