महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणाऱ्या मालक ,कंत्राटदार व बिल्डरांच्या वर फौजदारी खटले दाखल करा!
सात जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या साठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या कामगारांना दररोज 808 रुपये किमान वेतन,शहरी भागामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दररोज 842 रुपये किमान वेतन व महानगरपालिका परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दररोज 875 रुपये किमान वेतन जाहीर केलेली आहे. (याबाबत शासन निर्णय लगत जोडलेला आहे) परंतु महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात लाखो बांधकाम कामगारांना दररोज पाचशे रुपये पेक्षाही कमी वेतन मिळत. अशाप्रकारे मालक, कंत्राटदार व बिल्डर दररोज बांधकाम कामगारांना तीनशे रुपये पेक्षा कमी पगार देऊन बांधकाम कामगारांची लूट करीत आहेत.
किमान वेतनापेक्षा कमी पगार देणारे मालक कंत्राटदार व बिल्डर यांच्यावर किमान वेतन कायद्याखाली किमान वेतन दिले नाही म्हणून फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्यामध्ये सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा होऊ शकते.
परंतु महाराष्ट्र शासन या बिल्डरना सामील असल्यामुळे एकाही महाराष्ट्रातील बिल्डरवर कंत्राटदारावर किमान वेतनापेक्षा कमी पगार दिलेला आहे म्हणून केस केली जात नाही.
म्हणूनच आता महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी संघटित होऊन किमान वेतन मिळण्यासाठी तीव्र संघर्ष करायला पाहिजे आणि किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळाल्यास संघटनेकडे तक्रार करून किमान वेतना इतके पगार मिळवून घ्यायला पाहिजेत.
विशेषता महाराष्ट्रामध्ये महिला बांधकाम कामगारांना दररोज फक्त अडीचशे ते तीनशे रुपये पगारावर राबवून घेतले जाते .परंतु प्रत्यक्षात महिलांना सुद्धा कमीत कमी 875 रुपये दररोज पगार कायद्यामध्ये आहे.
किमान वेतनापेक्षा कमी पगार देणाऱ्या मालक कंत्राटदार व बिल्डरवर किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी बांधकाम कामगार कोर्टामध्ये केस दाखल करू शकतात. इतकेच नव्हे तर संघटन सुद्धा सामुदायिक केस दाखल करू शकतात.
तर याबाबत कोणाच्या तक्रारी असल्या संघटनेकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करीत आहोत.
महाराष्ट्रात बांधकाम कामगार विषयक कायद्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि किमान वेतन मिळण्याचा लढा उभारण्यासाठी मंगळवार दिनांक 11 जून रोजी ठीक सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा मराठा समाज सांस्कृतिक भवन सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्यास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inसांगली
महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणाऱ्या मालक ,कंत्राटदार व बिल्डरांच्या वर फौजदारी खटले दाखल करा!
