7 जून 2024 पासून महाराष्ट्रामध्ये आशा व गटप्रवर्तक महिला थकीत वाढीव मानधनसाठी जोरदार आंदोलन करणार!
13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार नोव्हेंबर 2023 पासून आशांना दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना दरमहा 1000 रुपये मानधन वाढीची संपूर्ण थकीत रक्कम त्वरित मिळेपर्यंत आंदोलन करण्यात येईल.
मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी मानधन वाढीची फक्त घोषणा केलेली नसून तसा शासकीय आदेश जीआर सुद्धा 14 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणूनच एक नोव्हेंबर2023 पासून ते मे 2024 अखेरपर्यंत सहा महिन्याची थकबाकी सत्वर मिळावी अशी मागणी करीत आहोत.
गटप्रवर्तक महिलांच्या संदर्भामध्ये फक्त एक हजार रुपये मानधन वाढ करून महाराष्ट्र शासनाने 4000 गटप्रवर्तक महिलांचा अपमानच केलेला आहे.
दरम्यान मागील तीन महिन्यापासून आमच्या संघटनेने सातत्याने ईमेलद्वारे निवेदन देऊन आणि प्रत्यक्षात मुंबईत निवेदन देऊन सर्व गट प्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ मिळावेत तसेच ज्या गटप्रवर्तक महिलांची एकूण सेवा कालावधी दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांचे समायोजन करण्यात यावे. आणि ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली नाहीत त्यांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार ,हक्क व त्यानुसार मानधन वाढ मिळून मानधनाशिवाय प्रवास भत्ता मिळावा अशी ही मागणी करीत आहोत.
तरी याबाबत संघटनेच्या वतीने पाठवलेले निवेदन घेऊन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडे निवेदन पाठवून द्यावे. व प्रत्येक प्राथमिक केंद्र, पंचायत समिती जिल्हा परिषद इत्यादी समोर निदर्शने करून शासनाकडे ते निवेदन पाठवून द्यावे.
असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inसांगली
7 जून 2024 पासून महाराष्ट्रामध्ये आशा व गटप्रवर्तक महिला थकीत वाढीव मानधनसाठी जोरदार आंदोलन करणार!
