आशा महिलांचे थकीत 35 हजार रुपये मानधन द्या मागणीसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर आशा महिलांचे जोरदार आंदोलन!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी 13 मार्च 2024 रोजी विधानसभेमध्ये घोषणा केली की महाराष्ट्रातील 68 हजार आशा महिलांना दरमहा नोव्हेंबर 2023 पासून प्रत्येकी 5000 रुपये मानधन वाढ देण्यात येईल. तसाच 14 मार्च 2024 रोजी जेआरए काढण्यात आला. परंतु प्रत्यक्षात मात्र आशा महिलांना अजूनही मानधन वाढीमधील एक रुपये मिळालेला नाही. त्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेसमोर शेकडो महिलांचे जोरदार आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणाऱ्या महिलांच्या समोर बोलताना युनियनचे अध्यक्ष काँग्रेस संकट पुजारी यांनी सांगितले की ऑक्टोबर 2023 पासून महाराष्ट्रामध्ये 68 हजार अशा व चार हजार गटप्रवर्तक महिला मानधन वाढीसाठी व गटप्रवर्तक महिलांच समायोजन होण्यासाठी बेमुदत संपावर होत्या*.
शेवटी आरोग्यमंत्र्यांनी अशांना सात हजार रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याचे सुचित केलेले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अशा महिलांना पाच हजार रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तक महिलांना फक्त एक हजार रुपये मानधन वाढ करण्यात आली त्यामुळेही प्रचंड नाराजी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये आहे झालेल्या निर्णयाचेही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
इतकेच नव्हे तर मानधन वाढ झालेली आहे म्हणून मागील चार महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक आरोग्य खात्यातील अधिकारी अशा महिलांच्यावर प्रचंड काम वाढ ताणवाढ लादत आहेत. नेमून न दिलेले कामे करण्यास सांगत आहेत अशाही प्रकारे अन्याय सुरू आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांनी चर्चेमध्ये असे सांगितले की जे लिखित काम आशांना ठरवून दिलेले आहे त्याशिवाय इतर कोणतेही कामे अशाने करू नयेत असे काम आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांनी असाही आदेश केला की अशांचे कामकाज नीट समजावून सांगण्यासाठी दर मासिक बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यानीं रिपोर्ट जिल्हा परिषदेकडे सादर करावा.
यानंतर झालेल्या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे समोर असे घोषित करण्यात आले की. पुढील आठ दिवसांमध्ये मुंबईमध्ये शिष्टमंडळ संघटनेचे जाऊन मानधन वाढ बद्दल चर्चा करण्यात येईल. तसेच 2018 सालापासून भारत सरकारने अशांच्या मानधनांमध्ये काही वाढ केलेले नाही यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये दिल्लीस मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीसाठी आतापासूनच आशा महिलांनी नावे नोंदवावी असे सांगण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ सुमन पुजारी, कॉ शंकर पुजारी, सुनंदा गेळे ,उषा पाटील, रेखा परीट, सुवर्ण सातपुते, मनीषा कदम, कल्पना पाटील, अनिता बनसोडे, रेहाना पटेल, सुजाता नरळे आशु जोगदंड,अर्चना कलगुडगी, अर्चना दुबोले, वनिता हिप्परकर, रोहिणी जाधव, वनिता गांजागोळ, सुजाता पाटील आणि कल्पना पाटील इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
Posted inसांगली
आशा महिलांचे थकीत 35 हजार रुपये मानधन द्या मागणीसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर आशा महिलांचे जोरदार आंदोलन!
