केंद्रीयराज्यमंत्री पदाची हैट्रिक साधणारे संघर्षनायक रामदास आठवले यांचे मुंबईत दि.16 जून रोजी मुंबईत आगमन होणार
मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे दि.16 जून रोजी सकाळी 11 वाजता भव्य स्वागत होणार — सिद्धार्थ कासारे
मुंबई दि.12 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची हैट्रिक साधून ना.रामदास आठवले यांचे दि.16 जून रोजी सकाळी 11 वाजता मुंबई विमानतळावर टर्मिनल 1 येथे आगमन होत आहे.त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईतील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे.या स्वागत समारंभास रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत उभा करून केंद्र सरकार मध्ये ही रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्या चे महत्व आणि रिपब्लिकन पक्षाची ओळख देशात ठळक उभी करणारे
संघर्षनायक राष्ट्रीय नेते ना.रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा केंद्रीय राज्य मंत्री झाले आहेत. काही नेते रिपब्लिकन संकल्पना मिटविण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र ना.रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकलपनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर मजबुतीने जिवंत ज्वलंत ठेवला आहे. त्याचा सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देशभरातील भीम सैनिकांना अभिमान आहे.आपल्या लाडक्या प्रिय नेत्याने भारत सरकार मध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा बहुमान मिळविला त्याचा आनंद देशभर साजरा होत आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार वारसा रिपब्लिकन वारसा पुढे घेऊन जात असल्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद रामदास आठवलेंना प्राप्त होत आहे.त्यामुळे आज तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा बहुमान रामदास आठवले यांना मिळाला आहे.केंद्रीय राज्यमंत्री पदाचा कार्यभार तिसऱ्यांदा स्वीकारल्या नंतर ना. रामदास आठवले दिल्लीतून मुंबईला दि.16 जुना रोजी सकाळी 11 वाजता मुंबईत येत आहेत.मुंबई च्या डोमेस्टिक विमानतळ टर्मिनल 1 येथे ना.रामदास आठवले यांचे भव्य स्वागत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.या वेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अजित रणदिवे; संजय डोळसे; रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; संजय पवार आणि साधू कटके हे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्ते सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडी सर्व आघाडी चे रिपब्लिकन कार्यकर्ते या स्वागत सोहळ्यास उपस्थित राहतील तसेच वरिष्ठ नेते राष्ट्रीय कमिटी आणि राज्य कमिटी चे मुंबईतील पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.