आधार फाउंडेशन व ग्रामपंचायत चोकाक यांच्या संयुक्त विद्यमाने चोकाक येथे वृक्षारोपण संपन्न
प्रतिनिधी शीतल कांबळे
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे आधार फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण करण्यात आले आले यावेळी आधार फाउंडेशन चे अध्यक्ष व सदस्य यांनी झाडे लवण्यापासून ते त्यांचे संगोपन करणे याचे महत्त्व पटवून दिले, फक्त झाडे लावणे म्हणजे झालं असं नाही तर ती कशी जगवता येतील हे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले सध्या वृक्षांचा होत असलेली भरपूर प्रमाणात वृक्ष तोडी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत झाडे लावणे व त्यांची योग्यरीत्या संगोपन करणे ही काळाची गरज आहे वृक्ष जर कमी असतील तर पावुस कमी पावूस कमी पडला तर पाण्याचा दुष्काळ हा दुष्काळ जर थांबवायचा असेल तर वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही असे हे ते बोलत होते, आधार फाउंडेशन सुमारे दोन हजार सात सालापासून कार्यरत आहे तसेच सर्वांच्या सहकार्याने फाउंडेशन चे कार्य जोमात सुरू असल्याचे स्पष्ट केले तसेच गावचे सरपंच सुनिल चोकाककर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आधार फाउंडेशन चे कौतुक करत ते बोलत होते आधार फाउंडेशन म्हणजे वसुंधारेचा आधार अश्या शब्दात त्यांनी त्यांचे कौतक केले तसेच मागील वर्षी देखील ग्रामपंचायत मार्फत सुमारे 60 झाडे लावली होती पण दु्दैवाने त्यातील फक्त तीस टक्के झाडांची वाढ झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आधार फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात येत आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, वृक्ष संरक्षण कसे करावे हे देखील आधार फाउंडेशन यांच्याकडून शिकायला मिळणार तसेच यावेळी जास्तीत जास्त वृक्ष कसे जगातील याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित आधार फाउंडेशन चे सर्व स्वयंसेवक तसेच सरपंच सुनिल चोकाककर, ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे, ग्राम पंचायत सदस्या सौ सविता चव्हाण, सदस्या सौ रेश्मा माळगे, सदस्य प्रवीण माळी,बाबा प्रोडक्शन चे निर्माते दिग्दर्शक नयन जाधव, सामाजिक कार्यकर्ते समीर कांबळे, महावीर चींचवाडे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
आधार फाउंडेशन व ग्रामपंचायत चोकाक यांच्या संयुक्त विद्यमाने चोकाक येथे
