वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर 26 कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यास नकार देत असल्यामुळे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर शासनाने त्वरित कारवाई करावी यासाठीचे आंदोलन तीव्र करणार.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर 26 कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार देण्यास नकार देत असल्यामुळे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर शासनाने त्वरित कारवाई करावी यासाठीचे आंदोलन तीव्र करणार.

सांगली औद्योगिक न्यायालयामार्फत २०१७ साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास आदेश करण्यात आलेला आहे की त्यांनी नियमानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. परंतु न्यायालयीन आदेशाचा अवमान करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा फक्त पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. दुसऱ्या बाजूस कायम कर्मचाऱ्यांना दरमहा 85 हजार रुपये पगार दिला जातो. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन दरमहा फक्त पंधरा हजार रुपये पगार देऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राबवून घेऊन त्यांच् भयानक शोषण वालचंद महाविद्यालयामार्फत सध्या सुरू आहे.


या अन्यायाविरुद्ध सांगली सहायक कामगार आयुक्त श्री एम ए मुजावर यांच्याकडे तक्रार दाखल केलेले असून याबाबत सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांनी आठ जुलै रोजी संयुक्त बैठक आयोजित केलेली होती.
या बैठकीमध्ये सुद्धा नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास व्यवस्थापकांचे प्रतिनिधी श्री अमोल चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉक्टर दबडे व श्री ताम्हणकर यांनी नकार दिला आहे.त्यामुळे जोपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमानुसार वेतन ठरवले जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवून आंदोलन सुरूच राहील असे कामगार संघटना प्रतिनिधींनी घोषित केलेले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षकेतर कर्मचारी राहुल चिरोटे ,प्रवीण गायकवाड ,दिलीप कोळेकर, सारिका पवार ,विनोद भंडारी, गणेश कुंभार ,प्रदीप कांबळे, वर्धमान पाटील इत्यादी करीत आहेत.
दरम्यान शुक्रवारी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच शिष्टमंडळ भेटून त्यांच्याशी चर्चा केली असता सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास नियमानुसार वेतन द्यावे असा आदेश केलेला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांचा आदेश व न्यायालयीन आदेश पायदळी तुडवून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापक शिक्षकेतर कर्मचारी यांचं रोज क्रूर थट्टाच करीत आहेत.
त्यामुळे सर्वच कर्मचारी कामगारांच्या मध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे.
सध्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे आंदोलन सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवलेले आहे. जर व्यवस्थापकानी कायदा पाळण्यास नकार दिल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे पत्रक महाराष्ट्र राज्य लाल बावटा जनरल कामगार युनियन चे कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *