सोलापूर दि. सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय कार्य करण्याची आवड असलेले व कोणतेही प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तप्ततेने काम करण्याची सुस्वभावी निस्वार्थी वृत्ती हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे पुणे येथे वास्तव्यात असणाऱ्या बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांचा राज्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटना व संस्थेशी घनिष्ठ संबंध असून बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक वर्षापासून केलेल्या कार्याची दखल सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले वृत्तपत्र दैनिक तुफान क्रांतीचे मुख्य संपादक मिर्झागालिब मुजावर यांनी घेतली असून दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंचायत समिती सांगोला येथे नुकताच पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्राच्या वतीने आदर्श सेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित आणि गौरवण्यात आले.
बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना यापूर्वीही विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित व गौरविण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्यात सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य वृक्षरोपण रेशनिंग गरजू नागरिकांना आर्थिक मदत शेतकरी शेतमजूर कामगार व महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे हे काम करीत आहे बहुजन जनता दलाच्या माध्यमातून राज्यात अनेक मोर्चे धरणे आंदोलन आमरण उपोषण व जनजागृती चे हि कार्यक्रम सातत्याने राबविण्यात सक्रिय असतात तर रक्तदान शिबिर रक्तगट तपासणी आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यशाळेचे आयोजन हे करतात सर विविध थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करून या महामानवाचे विचार जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम ते करीत आहेत
बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रातील पत्रकार आणि मान्यवर आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे दैनिक तुफान क्रांतीचे उपसंपादक जावेद आतार यांनी कळविले आहे
Posted inसोलापूर
दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्तमा पंडितभाऊ दाभाडे यांना आदर्श सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
