राज्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी एकूण 32 योजनांचे बंद काम त्वरीत सुरू न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार आंदोलन करणार!

राज्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी एकूण 32 योजनांचे बंद काम त्वरीत सुरू न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार आंदोलन करणार!


सांगलीमध्ये 12 जुलै 2024 रोजी बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यामध्ये आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.
सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अत्यंत महत्त्वाच्या 32 योजनांचे काम गेल्या वीस दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. उदाहरणार्थ एखादा नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस त्यांच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपयाची रक्कम मागणसंदर्भात अर्ज मंडळाच्या पोर्टलवर आज दाखल होत नाही .
सर्व सर्व शाळा कॉलेजेस पूर्ववत सुरू झालेली असून सध्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या साठी शिष्यवृत्ती मिळणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शिष्यवृत्ती चा फॉर्म ऑनलाइन पोर्टल बंद असल्यामुळे भरून घेतला जात नाही. इतर कोणतेही अर्ज भरून घेतले जात नाहीत. त्यामुळे प्रसूती आर्थिक सहाय्य योजना, विवाह आर्थिक सहाय्य योजना व इतर सर्व योजनांचे काम सध्या पूर्णपणे ठप्प आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमार्फत सर्व काम ऑनलाईन केले जाते परंतु ऑनलाईन पोर्टल सध्या बंद आहे आणि सर्व ऑनलाईन कामकाजाचा सध्या बोजवारा उडालेला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच देण्याचे काम तेवढे जोरात चालू आहे.
ते एवढ्यासाठीच चालू आहे की कंत्राटदारांचे भले करण्यासाठी सुरू आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 19 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी दहा लाख बांधकाम कामगारांना 15 मे पर्यंत भांडी देण्याचे काम होणार आहे. एका भांड्याच्या संच ची किंमत कंत्राटदारांना 8400 इतकी देण्यात येणार आहे.
नोंदीत बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच देण्याच्या योजनेची आम्ही स्वागत करीत आहोत परंतु त्याबरोबरच इतर योजना बंद करणे हे बांधकाम कामगारांच्यावर अत्यंत अन्यायकारक असल्यामुळे या अन्यायाविरुद्ध आम्ही योजना सुरू होईपर्यंत आंदोलन करणार आहोत.
सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे 23 जून 2024 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 49 लाख 22 हजार 950 अर्ज स्वीकारलेले आहेत.त्यापैकी अर्जावर प्रक्रिया 44 लाख 20 हजार 928 इतकी सुरू आहे. अर्ज मंजुरीसाठीची संख्या 34 लाख 884 इतकी असून इतर अर्जासहित सध्या एकूण नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 19 लाख इतकी आहे.
तरीही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सर्व ऑनलाईन काम सध्या ठप्प असल्याने ऑनलाइन काम सुरू होण्यासाठीआंदोलनाची सुरुवात मुख्यमंत्री,कामगार मंत्री व सचिव यांना निवेदन ईमेल द्वारे उद्या पाठवून देऊन सुरू करणार आहोत.
आणि प्रत्यक्ष 23 जुलै रोजी मुंबई येथे संबंधित मंत्री व सचिवाना भेटणार आहोत. तरी याबाबत कामगार संघटना प्रतिनिधींनी मुंबईत 23 तारखेला उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी व पदाधिकारी साथी सागर तायडे यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *