ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे
ॲड. प्रकाश आंबेडकर : शरद पवारांचे स्टेटमेंट अत्यंत घातक
पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात मुंबई, चैत्यभूमी येथून सुरू होऊन ती आज महात्मा फुले वाड्यात आली. या वेळी आंबेडकर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना अभिवादन केले. या वेळी आंबेडकर म्हणाले की, Sc आणि St यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मध्यंतरी शरद पवारांचे स्टेटमेंट होते की, आम्ही समाजाचे 225 आमदार निवडून आणणार. यामधून असे दिसते की, ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करायचे. आरक्षणाच्या संदर्भातील परिस्थिती सांगणे गरजेचे आहे. आता निर्णायक वेळ आहे. मिळालेल्या अधिकारांसोबत आहात की, नेत्यांच्या आणि संघटनेच्या सोबत आहे.
आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण कोणत्याही पक्षात असाल, तर तिथे ओबीसींना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आपण 100 चा आकडा गाठत नाही, आणि हा आकडा आपण गाठत नसू तर आरक्षण वाचत नसल्याचे त्यांनी सांगितले.
माझे आवाहन आहे की, आपण मतदार आहात. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि भाजप हे ब्राह्मण आणि कायस्थ यांचे प्रतिनिधी आहेत.जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी कायदेशीर नाही, असे कोणी म्हणत नाही. तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवू नका. ही मंडळी फसवणूक करणारी असल्याची टीका ॲड. आंबेडकरांनी प्रस्थापित नेत्यांवर केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, अविनाश भोसिकर, पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने