लातूर : दिनांक ४ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संदीप निकुंभ ह्यांनी अरविंद खोपे ह्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व व्यक्तींवर आणि शासकीय यंत्रणेवर करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली. त्यावेळी ते अस म्हणाले की, आपल्या लातूर शहरामध्ये अरविंद खोपे नावाच्या एका लहान मुलाची त्याच्याच वसतिगृहात दि.२९ जुलै २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतरचा घटनाक्रम हा अतिशय वेदनादायी होता. अनेक दिवस त्यावर अनेक चर्चा सुरू आहेत.परंतु आम्ही त्या चर्चांचे पुन्हा विश्लेषण करण्यापेक्षा आता ज्या गोष्टी शासन प्रशासन अधिकारी वर्ग आणि एकंदरीतच सर्व सत्ताधारी ज्या पद्धतीने दबाव आणून बदलण्याचा प्रयत्न करत आहेत ते थांबवण्यासाठी व अरविंद खोपे ह्या बालकाला न्याय मिळण्यासाठी जी पावलं उचलणार आहोत त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच अरविंद खोपे ह्याच्या मृत्यूस कारणीभूत टेंकाळे, सुर्यवंशी,शाळेचे संचालक अजित पाटील कव्हेकर,मुख्याध्यापक व इतर सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वसतिगृहात घडलेल्या प्रकारचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज हे काहीही छेडछाड न करता प्रसारित करावे. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. अरविंद खोपे ह्याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे. सर्व शासन प्रशासन अधिकारी ज्यांनी ह्या प्रकरणात दिरंगाई केली त्या सर्वांवर कडक कारवाईचे आदेश त्वरित काढणे. या मागणीसाठी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे दयावान सरकारच्या वतीने निवेदन देत त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदरील मागणी मंजूर न झाल्यास अरविंद खोपे ह्याच्या मृत्यू आणि ह्या संचालकांच्या सर्व संस्थांवर त्वरित तपासासाठी हाई कोर्टात PIL दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान दयावान सरकार महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा कार्यालय ते एम आय डी सी पोलीस स्टेशन पर्यंत भव्य ताफा घेत सदरील घेटनेच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. या रॅलीला संबोधित करणार संदीप भाई निकुंभ म्हणाले की, या सर्व मागण्या ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्वरित पूर्ण होण्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देणार आहोत.आपल्या शहरातील सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याची काळजी घेऊनच आम्ही न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू ठेवू. असेही आश्वासन त्यांनी आज दिले.पण जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असे स्पष्ट वक्त्यव्य त्यांनी केले.आता कोणतेही दबाव तंत्र कमी येणार नाही असेही त्यांनी त्यांच्या नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट शैलीत सरकारला दयावान सरकारने खडे बोल सुनावले. तसेच सदरील निवेदनाच्या प्रती प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री,महारष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त,नांदेड यांना पाठविण्यात आले आहे. या वेळी लातूर जिल्हा अध्यक्ष नीलेश मांदळे, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रियाताई वैद्य, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिद्धार्थ राक्षे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजय वाल्मिकी, मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल खरात, परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग टाक, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे, जालना जिल्हाध्यक्ष विलास भाई येडे, परभणी जिल्हा विधी सल्लागार ऍड. राम वैराळे, परभणी शहराध्यक्ष रमेश घनघाव, शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, दयावान सरकार परभणी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, कलीम भाई, व दयावान सरकारचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दयावान सरकार
