खवलेमांजराची खवले विक्री करण्यासाठी आलेल्या 3 जणांना वनविभागाने केली अटक!!
विभागिय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळुण) यांना दापोली परिक्षेत्रातील, वनपरिमंडळ खेड मधील नियतक्षेत्र तळे मध्ये दिनांक ३०.०१.२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार मौजे भरणे येथील काळकाई मंदीरजवळ मुंबई गोवा हायवेनजिक एक इसम वन्यप्राणी खवलेमांजराची खवले विक्री करण्यासाठी येणार असल्यांची गुप्त माहीती मिळाल्या नुसार दापोली परिक्षेत्रातील कर्मचारी यांना घेऊन सापळा रचुन संबंधित ०३ संशयीत आरोपींना अटक केली होती.
आरोपीचे विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ सुधारणा २०२२ कलम ९, ३९, ४८अ, ४९ब, ५१, ५२ व ५७ अन्वये गुन्हा दाखल करुन संशयीत आरोपींना अटक करुन वनविभागामार्फत कसुन चौकशी करणेत आली. चौकशी दरम्यान प्रस्तुत गुन्ह्यामध्ये चौथा आरोपी समाविष्ट असल्याची माहीती वनविभाच्या हाती लागली होती.
तपासादरम्यान चौथ्या संशयीत आरोपीचा शोध रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच रायगड जिल्ह्यातही सुरुच होता.
दिनांक ०९.०८.२०२४ रोजी वनविभागाला मिळालेल्या माहीती नुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना आरोपी श्री. दत्ताराम शामा कोंडकेवय ६४ रा. वाघेरे पैकी कडसरी लिंगाणा संभाजीनगर. ता. महाड जि. रायगड यास त्याचे राहते घरातुन चौकशीसाठी ताब्यात घेतले.
श्री. दत्ताराम शामा कोंडके वय ६४ यास अटक करुन त्याची अधिक चौकशी करुन आज दिनांक १०.०८.२०२४ रोजी आरोपीला मे. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग-०१, खेड यांचेसमोर हजर केले असता, सदर आरोपींना १२ ऑगस्ट पर्यंत रिमांड कस्टडी मंजूर करणेत आली आहे. दत्ताराम कोंडके हा आरोपी खुप दिवस फरार होता. वनविभागाने त्याला शिताफिने पकडले.
दत्ताराम कोंडके या आरोपीला पकडल्याने खवलेमांजराची हत्या कोणी केली याची उकल करण्यास वनविभागाला मदत होणार आहे.
सदरची कार्यवाही श्री. आर. एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक (प्रा), कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती. गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्री. वैभव बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, श्री. सुरेश उपरे, वनपाल खेड, श्री. रानबा बंबर्गेकर, वैभव काट्चेखाये, श्री. अशोक ढाकणे, श्री. परमेश्वर डोईफोडे (सर्व वनरक्षक) यांनी पार पाडली. पुढील तपास श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कायदयान्वये कोणत्याही वन्यप्राण्यास इजा पोहचविणे, शिकार करणे, त्याच्या अवयवांची तस्करी/विक्री करणे, अवैधरित्या वाहतुक करणे हा गुन्हा असून सदर गुन्हयाकरीता आरोपीस सक्षम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वन्यजीवांबाबत अवैध कृत्य निदर्शनास आलेस त्वरीत वनविभागाची हेल्पलाइन नंबर १९२६ किंवा जवळच्या वनकार्यालयाशी संपर्क साधावा.
श्री. प्र. ग. पाटील परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली मोब.749957578
