दूधगंगा नदी , सुळकुड बंधारा व दत्तवाड परिसरातील उन्हाळ्यातील पाणी टंचाई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दूधगंगा ही पश्चिम भारतातील कृष्णा नदीला उजवीकडून मिळणारी उपनदी आहे. ही पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगम पावते आणि ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुड गावा पर्यंत महाराष्ट्रात वाहते आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून भोज बारवाड बेडकिह्याळ बोरगांव सदलगा पर्यंत कर्नाटक राज्य सिमाभागातून पूर्वेकडे वाहते. त्यानंतर ती दूधगंगा नदी घोसरवाड दत्तवाड नवे दानवाड जुनेदानवाड या महाराष्ट राज्यातील गावातून वाहत पुढे जुनेदानवाड येथे कृष्णा व दूधगंगा संगम होऊन कर्नाटक राज्यात बेळगांव जिल्ह्यातील कल्लोळ चंदूर यां गावात प्रवेश करते
त्तिच्या मार्गाचा घोसरवाड दत्तवाड नवेदानवाड जुने दानवाड आदी गांवाचा कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेचा एक भाग आहे
🔥उन्हाळ्यातील दत्तवाड भागातील पाणी टंचाई
उन्हाळ्यातील मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये घोसरवाड दतवाड दानवाड या भागामध्ये दूधगंगा नदी कोरडीच राहत असते त्याचे मूळ कारण दूधगंगा नदी उगमापासून ते कोल्हापूर सुळकुड पर्यंत महाराष्ट्रामध्ये वाहते महाराष्ट्रातील जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता म्हणतात दूधगंगा नदी सिमा ही महाराष्ट्र राज्यात सुळकुड पर्यंत आहे सुळकुड पासून पुढे ही नदी कर्नाटक राज्यात म्हणजे बारवाड भोज बोरगाव सदलगा व पुन्हा महाराष्ट्र राज्यात घोसरवाड दत्तवाड नवे दानवाड जुने दानवाड वाहत असल्यानेउन्हाळ्यामध्ये सुळकुड बंधाऱ्यातून या नदीला आम्हाला पाणी देता येत नाही सुळकुड बंधाऱ्यातील सांडपाणी वरच घोसरवाड दत्तवाड व दानवाड गावातील लोकांना उन्हाळ्यामध्ये आपली ताण भागवावी लागते उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर सुळकुड पासून वर असणारे गावे किंवा गावातील लोकप्रतिनिधी दतवाड दानवाड या गावांना पाणी मिळावे यासाठी कधी आंदोलन केलेली नाहीत घोसरवाड दत्तवाड या गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईला सुळकुड बंधारा अधोरिकेतीत होते . दूधगंगा नदीची महाराष्ट्रातील सीमा हद्द जुने दानवाड गावापर्यंत होणे गरजेचे आहे हा मूळ प्रश्न आहे या प्रश्नावर घोसरवाड दत्तवाड टाकळीवाडी नवेदानवाड जुने दानवाड या गावाने आंदोलन उपोषण करणे गरजेचे आहे