लढणार, भिडणार आणि महाराष्ट्र जिंकणार!खासदार वर्षा गायकवाड.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी 165 अंधेरी विधानसभा क्षैत्रात मुंबई न्याय यात्रेचे आयोजन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते. जोगेश्वरी पासून अंधेरी पश्चिम आंबोली मार्गे गिल्बर्ट हिल परीसरातून निघालेल्या न्याय यात्रेला अंधेरीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. अंधेरी परीसरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, पाण्याची समस्या यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल करुनही न्याय मिळत नसल्यानेच आज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले अशी प्रतिक्रिया मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हरगुण इंद्रपाल सिंग यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोकभाऊ जाधव यांनी गेली अनेक वर्षे वाहतुकीची समस्या,महागाई, भरमसाठ येणाऱ्या वीज बिलामुळे नागरिकांना होणाऱ्या आर्थिक विवंचनेमुळे मुक्त करण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मुंबई मध्ये निघालेली ही न्याय यात्रा परीवर्तन घडवेल अशी आशा व्यक्त केली. स्थानिक नेते माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी आपल्या विभागातील समस्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मांडल्या.
महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी मी लोकसभेत आवाज उठवत आहे. धारावी पुर्नवसन, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यातून राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी निघालेल्या या न्याय यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्व सामान्य जनता आता रस्त्यावर उतरली आहे असे प्रतिपादन वर्षा गायकवाड यांनी केले. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार, भिडणार आणि महाराष्ट्र जिंकणार! असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई न्याय यात्रेत व्यक्त केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *