
सांगली जिल्ह्यामध्ये सध्या एक लाखापेक्षा जास्त नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या आहे. निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दहा हजारापेक्षाही जास्त बांधकाम कामगारांना भांड्यांचे संच मिळवून देण्यामध्ये संघटनेस यश आलेले आहे.
जत तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या एका टोकाला असलेले कर्नाटक मधील विजापूर जवळ गाव बालावल येथील बांधकाम कामगारांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भांडी वाटप कार्यक्रमासाठी शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजीआमंत्रित केलेले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या व महाराष्ट्राच्या आशा गट प्रवर्तक युनियनच्या नेत्या कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील प्रमुख कामगार संघटनांच्या वतीने सहा गोष्ट 2024 रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांना मुंबईमध्ये निवेदन देण्यात आले.त्यावेळेस झालेल्या चर्चेनुसार सांगली जिल्ह्यातील व इतर काही जिल्ह्यातून बंद पडलेले सर्व बांधकाम कामगारांचे ऑनलाईन काम सुरू करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार सांगली जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील ऑनलाईन काम सुरू झाले उदाहरणार्थ शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे व इतर लाभाचे फॉर्म भरणे सुरू झाले परंतु त्यांच्यासाठी अर्ज तपासण्याची तारीख जून 2025 मधील देण्यात आलेली आहे म्हणजेच जून 2025 पर्यंत त्यांचे कसलेही अर्ज मंजूर होणार नाहीत. शिवाय जून 25 पर्यंत ची तारीख सुद्धा त्यांच्या कोट्यानुसार फुल झाल्यामुळे सध्या ऑनलाईन काम परत मंडळाने बंदच केलेले आहे. हे बांधकाम कामगारांच्या वर अत्यंत अन्यायकारक असून या विरोधी कामगारांना आंदोलन करण्याशिवाय काही पर्याय राहिलेले नाही असे त्यांनी सांगितले.
या सभेमध्ये बोलताना या मेळाव्याचे अध्यक्ष व निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव कॉ विशाल अशोक बडवे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने 2014 सालीच असा आदेश केलेला आहे की कोणत्याही बांधकाम कामगारांचे कामकाज त्याबाबत एका महिन्यात ज्या त्या अर्जांचा निपटारा केला पाहिजे. परंतु या ठिकाणी मात्र एक एक वर्षभर अर्ज विलंबाने मंजूर केले जात आहेत.
अत्यंत संताप जनक बाब कोणती असेल तर बांधकाम कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अंत्यविधीच्या खर्चासाठी दहा हजार रुपये देण्याची एक योजना आहे हे दहा हजार रुपये मागणीचे अर्ज करणे सुद्धा सध्या बंद आहे आणि अंत्यविधीची रक्कम वर्षश्राद्ध घातल्यानंतर सुद्धा मिळत नाही अशी स्थिती आहे तसेच नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाह 51 हजार रुपये दिले जातात परंतु त्या मुलीचे लग्न होऊन मूल झाले तरीही त्या योजनेचा लाभ मिळत नाही अशी स्थिती आहे.तरी ही सर्व परिस्थिती बदली पाहिजे व आजपर्यंत जितके केलेले सर्व अर्ज आहेत ते ताबडतोब मंजूर करून त्याचा निपटारा गणेश चतुर्थी पूर्वी झाली पाहिजे अशी मागणी विशाल अशोक बडवे यांनी मेळाव्यामध्ये केलेली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
या मेळाव्याचे अध्यक्ष विशाल अशोक बडवे होते. प्रमुख वक्त्या म्हणून सुमन पुजारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या महत्त्वपूर्ण मेळाव्यासाठी बालगाव मधील सरपंच श्री रमेश पाटील, मालेसून हिरेमठ उपसरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन बालगाव मधील कार्यकर्ते श्री हुसेन नदाफ यांनी केले.