पाच हजार रुपये दरमहा मानधन वाढीची घोषणा झाल्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा महिलांच्या वर कामवाढ व ताणवाढ लादण्यात आली. काही अधिकारी सर्व अशांना म्हणू लागले की तुमच आता मानधन वाढलेला आहे त्यामुळे आम्ही सांगू ते काम तुम्ही केले पाहिजे अशा प्रकारे ऑनलाईन कामाची सक्ती करणे आणि कुठलीही काम सांगणे असा प्रकार करून आज अशा महिलांना कित्येक कामे विना मोबदलाच करावी लागत आहेत.
सध्या महाराष्ट्रामध्ये 68 हजार आशा काम करीत आहेत.त्या अशांच्यावर सक्तीने जे काम ठरवून दिलेले नाही ते सुद्धा काम करून घेतले जात आहे.
सर्वच ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे इतके करूनही महाराष्ट्र शासनाने आदेश करून सुद्धा अशा महिलांना मात्र वेतन चिठ्ठी दिली जात नाही. शासनाच्या आदेशाची वेतन चिट्टीची प्रत सोबत जोडलेली आहे.
तरी याबाबत आपण सत्वर 68 हजार महिलांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आशांना त्वरित सर्व थकीत मानधन वाढ देण्यात यावी तसेच मिळणाऱ्या मोबदल्याच्या वेतन चिठ्ठ्या देण्याबाबत आदेश करावा. वेतन चिट्ठी न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर सत्वर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आलेली असून 13 ऑगस्ट रोजी हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री मुख्य सचिव व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक यांना पाठवून देण्यात आलेले आहे.
वरील प्रमाणे कारवाई न झाल्यास आशा महिलांनी आंदोलनाची जोरदार तयारी करावी आणि हे निवेदन सर्व ठिकाणी द्यावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी पत्रक काढून प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inसांगली
महाराष्ट्रातील 68000 आशा महिलांना कामावर आधारित मोबदला वेतनचिट्टीसह त्वरित द्या आणि वेतन चिठ्ठी न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करा*
