पेठवडगांव येथे पत्याचे जुगार खेळावर छापा, 5,20,210/- रु. चा मुद्देमाल जप्त व 56 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
कोलहापुर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने पेठवडगांव येथे पत्याचे जुगार खेळावर छापा टाकून 2,26,710/- रु. रोख रक्कमेसह इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 5,20,210/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले . या प्रकरणी 56 आरोपीविरुध्द वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
मा. पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडित यांनी सध्या कोल्हापूर जिल्हयातील अवैध व्यवसायाची माहिती काढून परीणाम कारक कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत .त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकरवी अवैध व्यवसाची माहिती काढून परीणाम कारक कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेचे चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, भजने गल्ली पेठवडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे रमेश गनबावले यांचे मालकीचे बंदिस्त इमारतीमध्ये पत्याचे पानाचा जुगार खेळ चालू आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. मसुटगे, पोलीस अंमलदार संजय देसाई, संजय पडवळ, बालाजी पाटील, सतीश जंगम, महेश आंबी, महेश खोत, अशोक पवार, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, संतोष बरगे, वैभव पाटील, विजय इंगळे अशा पथकाने जावून भजनी गल्ली पेठ वहगांव येथे बलराम कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ नावाचे बंदीस्त खोलीत पत्याचे पानाचा चालू असले जुगार खेळावर दि. 15.08.2024 रोजी छापा टाकून एकूण 54 आरोपीना पकडले आहेत. सदर छापा कारवाईत 2,26,710/- रु. रोख रक्कम, 29 मोबाईल हॅन्डसेट व इतर जुगार गुन्हयाचा माल असा एकूण 5,20,210/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर ठिकाणी पकडलेले 54 आरोपी तसेच क्लब चा अध्यक्ष व घरमालक असे एकूण 56 इसमांचे विरुध्द वडगांव पोलीस ठाणे वेथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडगांव पोलीस ठाणे मार्फत सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, बी. महेंद्र पंडित सो यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. मसुटगे, पोलीस अंमलदार संजय देसाई, संजय पडवळ, बा लाजी पाटील, सतीश जंगम, महेश आंबी, अशोक पवार, महेश खोत, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, संतोष बरगे, वैभव पाटील, विजय इंगळे यांनी केली आहे.