बीड शहरात दि.5 ऑक्टोबर रोजी केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन – पप्पू कागदे
मुंबई दि. 3- केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड शहरात येत्या दि.5 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे या सत्कार सोहळ्यासाठी बिड शहरात होर्डिंग, कमानी, बॅनर निळ्या पट्ट्या व नीळ ध्वजाचा झंझावात निर्माण करून निळ्या वादळाचे शक्तीप्रदर्शन रिपाइंच्या वतीने येत्या 5 ऑक्टोबर रोजी बीड शहरात करण्यात येणार आहे.संघार्षनायक ना.रामदास
आठवले यांच्या स्वागतासाठी बीड नगरी रिपब्लिकन च्या निळ्या ध्वजांनी निळी निळी झाली आहे.अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.
केंद्रिय मंत्री मा. ना. रामदास आठवले यांचा बिड शहरात होणारा भव्य सत्कार सोहळा ऐतिहासीक करण्यासाठी भारतरत्न डॉ., बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला आघाडी पदाधिकारी, युवक आघाडी पदाधिकारी, गायरान धारक, सर्कल प्रमुख, महिला विद्यार्थी, क्रियाशिल सदस्य व कार्यकर्त्यांनी दि. ५ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी बिड शहरात रिपाइंच्या वतीने – होणाऱ्या मा. ना. रामदास आठवले यांच्या भव्य स्वागत रॅलीत व सत्कार सोहळ्यात हजारोच्या संखेने सामील होवून विराट शक्तीप्रदर्शन करावे. असे आवाहन आयोजक युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बिड जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी बीड जिल्हा रिपाइंच्या वतीने केले आहे.
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्य मंत्री मा. ना. रामदास आठवले यांची केंद्रिय मंत्री मंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्या बद्दल बिड जिल्हा रिपाइंच्या वतीने बिड शहरात केद्रिय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजक युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बिड जिल्हाध्यक्ष मा. पप्पुजी कागदे यांची आज दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी “
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रिय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांची भारत सरकारच्या केद्रिय मंत्री मंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्या बद्द्ल बीड जिल्हा रिपाइंच्या वतीने केंद्रिय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांचा ऐतिहासीक भव्य सत्कार सोहळा बिड शहरातील छ. संभाजी महाराज क्रिडांगणावर दि. ५ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी सायंकाळी ठिक ४:०० वाजता आयोजीत करण्यात आला आहे.
भव्य सत्कार सोहळ्यास मा. राजा सरवदे; मा. अविनाश महातेकर, मा. बाबुराव कदम, मा. गौतम सोनवणे, मा. दौलत खरात; अँड, ब्रम्हानंद चव्हाणः मा. मिलिंद शेळके ;परशुराम वाडेकर; चंद्रकांत चिकटे मा. श्रीकांत भालेराव मा. सिद्धार्थ कासारे मा. विजय मोरे, मा. डॉ. सिध्दार्थ भालेराव, मा. सचिन मोहीते, मा. विजय सोनवणे, मा. भास्कर रोडे आदी रिपाइं नेते उपस्थित राहणार आहेत.
केंद्रिय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या ऐतिहासीक भव्य सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून बिड जिल्हा रिपाइंच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी दुपारी ठिक ३:३० वाजता सत्कार मूर्ती मा. रामदास आठवले यांची हजारो रिपाइं कार्यकर्त्याच्या उपस्थितीत बीड शहरातील राजुरीवेस पासून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यत भव्य रैली विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
बीड जिल्हा रिपाइंच्या वतीने (५ ऑक्टोबर) शनिवार रोजी केद्रिय मंत्री मा.না. रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा ऐतिहासीक करण्यासाठी बीड जिल्हयातील बीड, गेवराई, माजलगांव, आमटरी, केज, परठी, अंबाजोगाई वडवणी, शिरुर, धारूर या सर्व तालुक्यातील गावा-गावात तसेच बीड शहरातील दलित वस्त्यामध्ये बैठकीचे आयोजन करून भव्य सत्कार सोहळ्याची जिल्हाभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.