छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूड पुतळा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करेपर्यंत प्रशासनाला गप्प बसू देणार नाही.. फिरोज मुल्ला (सर )

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूड पुतळा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करेपर्यंत प्रशासनाला गप्प बसू देणार नाही.. फिरोज मुल्ला (सर )

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूड पुतळा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करेपर्यंत प्रशासनाला गप्प बसू देणार नाही.. फिरोज मुल्ला (सर )


पुणे औंधरोड.. प्रभाग क्र 8 येथील पुणे मुंबई रोड बोपोडी हँरिस पुला जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूड पुतळा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप कालावधीपासून विलंबित असलेला पूर्णांकृती पुतळा आजून उभा राहिला नाही याकरिता पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लाक्षणीक धरणे आंदोलन स्वसस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे यांनी केले
फिरोज मुल्ला सर म्हणाले कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे वारंवार मागणी होत असताना पुणे मनपा प्रशासन गंभीर दिसत नाही कागदाचा खेळ मात्र जनतेसमोर प्रशासन नाचवत आहे अंदळ दळतंय कुत्र पीठ खातंय अस सरकारचा खेळ सुरु आहे पण आम्ही महापुरुषांच्या विचारावर त्याच्या आदर्शवर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही हे आंदोलन कमी वेळात व प्रमुख नेतेच्या उपस्थित मध्ये घेतले आहे पुढील लॉग मार्च मोर्चाचे नियोजन सर्व समविचारी पक्ष संघटनेला घेऊन करणार आणि छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही महापुरुषांच्या सन्मानसाठी कधीच मागे हटणार नाही असे जनतेला सबोधित फिरोज मुल्ला सर यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरानी आप आपले मनोगत व्यक्त केले प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला
या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आंबेडकर चलवळीतील नेते संजय कांबळे, किरण उर्फ पिट्या सूर्यवंशी प्रतिष्ठान व मनिष आनंद मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी,RPI(आय )राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पुणे जिल्हा अध्यक्ष जीवन घोंगडे, शिवसेना नेते गणेश शिंदे,मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख,जेष्ठ पॅन्थर नेते राजूभाई इनामदार, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आंग्रे, शिवसेना शाखा प्रमुख मन्थन आवघडे,नाना भालेराव, प्रकाश म्हस्के, जराल्ड डिसोझा, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते