१५३कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थतीमध्ये भूमिपूजन

१५३कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थतीमध्ये भूमिपूजन

🌍🔴स

१५३कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थतीमध्ये भूमिपूजन

बंदरांमुळे मच्छीमारांना ताकद – पालकमंत्री उदय सामंत

१५३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्य:- उदय सामंत

कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असे सुंदर बंदरे जिल्ह्यात करून दाखवणार: उदय सामंत

किरण सामंत यांच्या पाठपुराव्या नंतर गडकिल्ले संवर्धनासाठी ३ कोटी, रस्त्यांसाठी ४ कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले — उदय सामंत

रत्नागिरी — १५३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्य आहे. साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे, ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.*
साखरीनाटे मत्स्यबंदराचे भुमिपूजन पालकमंत्रीउदय सामंत यांच्या हस्ते आज झाले.

त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, १५३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या जेटीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे.

साखरी नाटे मिरकरवाडा बंदर, हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदर विकासासाठी २०० कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असे सुंदर बंदरे जिल्ह्यात होतील.

पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल. मच्छीमार भगिनींना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पालकमंत्री म्हणाले, विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी 3 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून 50 किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत.

साखरीनाटे बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण, राजापूर तालुक्यातील धरणासही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामदा धरण डागडुजीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांचा डिझेल कोटा बंद संदर्भात आपण स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी तुमच्या खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, सरंपच गुलजार ठाकूर, संरपच संदीप बानकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर, राहूल पंडित, अमजद बोरकर, अश्फाक हाजू, दीपक नागले, राजू कुरूप, शफी वाडकर, तहसिलदार विकास गंबरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *