म
महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांची सर्व आँनलाईन कामे आज पासून चालू करा असा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!( रिट पिटीशन क्रमांक 33 5972024)
तारीख 6 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री सोमेश्वर सुंदरम व श्री अरिफ डॉक्टर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की, बांधकाम कामगारांची सर्व कामांना आचारसंहितेचे कुठलेही निकष लागू होऊ शकत नाहीत. फक्त आचार संहितेमध्येच जर नवीन निर्णय झालेला असेल तरच तो सुरू करता येणार नाही. परंतु पूर्वी चालू असलेली सर्व लाभ देण्याचे ऑनलाईन काम सुरूच आज पासून ठेवावेत असं महाराष्ट्र शासनास उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे.
एडवोकेट सुधा भारद्वाज यांनी अत्यंत कुशलतेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस सादर करून आर्ग्युमेंट केले त्याबद्दल आम्ही कृती समितीच्या वतीने त्यांचे अत्यंत आभारी आहोत. एडवोकेट सुधा भारद्वाज यांनी महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना ई-मेल द्वारे उच्च न्यायालयाचा निकाल पाठवून दिलेला आहे. तसेच या बातमीपत्र सोबत सुद्धा उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडलेली आहे.
कॉ शंकर पुजारी, सागर तायडे, सुनील अहिरे, विनिता बाळेकुंद्रे, बिलाल,अखिलेश राव, कैलास रोटे, कालिदास रोटे व कमलुद्दीन इद्रिस यांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल केलेली आहे
निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन इमारत व इतर बांधकाम कामगारांना गाजर दाखवण्यात आले होते. मोठ्या मोठ्या जाहिराती , बॅनर्स, टीव्ही वर जाहिराती यातून पैशाची उधळपट्टी शासनाची चालू होती.
. आचारसंहितेच्या नांवाखाली पोर्टल मात्र दोन दिवस अगोदरच बंद केले. म्हणजेच कोणत्याही कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ कामगारांना घेता येणार नाही
या न्यायविरुद्ध महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृति समिती ने निश्चय केला आणि ऍड गायत्री सिंग व ऍडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्या मदतीने हाई कोर्टात केस दाखल केली.
*आचारसंहिता आहे म्हणून कल्याणकारी मंडळाच्या योजनांची कामे चालवणारे पोर्टल व सर्व कामे मंडळ बंद करू शकत नाही एका दिवसात पोर्टल चालू करा असे उच्च न्यायालयाने आदेश केलेले आहेत.
तरी या जजमेंटची कॉपी घेऊन आपल्या विभागातील कामगार मुख्यालयात भेट द्या. त्यांना ही कॉपी दाखवा व सर्व कामे चालू करण्यास भाग पाडा.
योजनाचा लाभ. भांड्याचे वाटप, सुरक्षा संच पेटी, नवीन नोंदणी, नूतनीकरण, मुलांचे शिक्षण, महिलांचे आरोग्य या विषयावर कामगारांना लाभ मिळवून द्या.असे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी, सह निमंत्रक
साथी सागर तायडे पदाधिकारी साथी विनीता बाळीकेंद्री यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे
Posted inसांगली
महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांची सर्व आँनलाईन कामे आज पासून चालू करा असा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!( रिट पिटीशन क्रमांक 33 5972024)
