शहापूर येथे गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा

शहापूर येथे गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा

शहापूर येथे गुरुवारी केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी यांची जाहीर सभा

इचलकरंजी –

279-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ गुरुवार 14 नोव्हेंबर 2024 रोजी  भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शहापूर गावचावडी चौक येथे दुपारी 4 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले व प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.

ते म्हणाले, उत्कृष्ट कल्पना असलेला दूरदर्शी आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन असलेला सक्षम प्रशासक जो परिणाम साध्य करण्यात विश्‍वास ठेवतो असे व्यक्तीमत्व असलेले नामदार नितीन गडकरी हे राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी शहरात येत आहेत.   महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ चारच दिवसांपूर्वी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची झंझावात सभा झाली. त्या सभेला न भूतो न भविष्यती अशी विक्रमी गर्दी झाली होती. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते नामदार नितीन गडकरी येत असून या सभेलाही विक्रमी गर्दी होईल. महायुती सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विविध योजना केवळ राबविल्या नाहीत तर त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविला आहे. याच विकासकामांच्या बळावर सुज्ञ जनता पुन्हा महायुतीची सत्ता आणेल. त्या दृष्टीने नामदार नितीन गडकरी यांची होणारी जाहीर सभा अत्यंत महत्वाची ठरणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सभेसाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सौ. शशिकला जोल्ले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर,

माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, यांच्यासह महायुतीतील विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. सर्वांनी मिळून एकजुटीने ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिक मतदार बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भोसले व दत्तवाडे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *