म

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती शिष्ठ मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांना निवेदन दिले.
निवेदनामधील मागण्यासंबंधी खालील विवेचन श्री विवेक कुंभार यांनी शिष्टमंडळास दिले. एक) 30 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सर्व ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी कालपासूनच ऑनलाईन नोंदणीचे काम सुरू झालेले आहे. म्हणून सर्व संघटनांनी तालुका पातळीवर कामास सुरुवात करावी.
सध्या महाराष्ट्रामध्ये जे सर्व थकीत प्रलंबित अर्ज आहेत त्याबाबत ते अर्ज सर्वप्रथम त्यांचा निपटारा करण्यासाठी संघटनांना बरोबर घेऊन निर्णय घेण्यात येतील.
महाराष्ट्रातील नोंदीत व प्रलंबित दर्जातील 54 लाख बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस देण्याची प्रक्रिया बोर्डाच्या पातळीवर मंजूर करण्यात आली. परंतु शासन मंजुरीसाठी काही तांत्रिक अडचणी आल्याने दिवाळीपूर्वी बोनस वाटप झाले नाही. पण निवडणुका झाल्यानंतर निश्चितच पाच हजार रुपयांचा बोनस मिळणार अशी त्यांनी खात्री दिली.
ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंटच्या तारखा दिलेले आहेत त्या पुढील कोणत्याही तारखा असल्या तरी तालुका पातळीवर तालुका कामगार सुविधा केंद्रावर त्यांना प्राधान्य देऊन प्रथम त्यांचे काम करण्यात येईल.
ज्या नोंदीत बांधकाम कामगाराना भांडी मिळण्यासाठी व सुरक्षा संच मिळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली असेल त्यांना आचारसंहिता काळातही भांडी व सुरक्षा संच देण्याबाबत सूचना प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
ग्रामसेवकानीं 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत सध्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी निवडणुक नंतरच्या काळामध्ये त्या समस्या सोडविण्यात येईल.
शिष्ट मंडळामध्ये कॉ शंकर पुजारी, साथी सागर तायडे, साथी विनिता बेळीकुंद्री ,साथी अनंत भालेराव , साथी मनिष गवरखेडे, साथी अक्षय भालेराव व साथी धीरज ढोबळे इत्यादींचा समावेश होता.
चर्चेमधून सर्व प्रश्न सुटलेले नसून पूर्वीची ऑनलाईन पद्धत बंद करून ती तालुका केंद्रावर केली जाणार आहे. हे संघटनांना मान्य नाही. म्हणून यापुढील काळातील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच राज्यव्यापी परिषद घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. असे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.