प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा यांचे संवर्धन तसेच येथील गुंफाजवळील झोपड्यांचे पुनर्वसन करा ; लोकसभा नियम ३७७ अंतर्गत खासदार रविंद्र वायकर यांनी मांडलेला विषय स्वीकारून आज सभागृहाच्या पटलावर ठेवला

प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा यांचे संवर्धन तसेच येथील गुंफाजवळील झोपड्यांचे पुनर्वसन करा ; लोकसभा नियम ३७७ अंतर्गत खासदार रविंद्र वायकर यांनी मांडलेला विषय स्वीकारून आज सभागृहाच्या पटलावर ठेवला

प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा यांचे संवर्धन तसेच येथील गुंफाजवळील झोपड्यांचे पुनर्वसन करा

– लोकसभा नियम ३७७ अंतर्गत खासदार रविंद्र वायकर यांनी मांडलेला विषय स्वीकारून आज सभागृहाच्या पटलावर ठेवला

– या प्रश्नांकडे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे वेधले लक्ष

दिल्ली :(विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पांडवकालीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा यांची देखभाल व संवर्धन करण्याबरोबरच गुंफेच्या परिसरातील झोपडपट्टीचे पुनर्वसन करून परिसराचे सुशोभीकरण केल्यास गुंफेच्या सौदर्यीकरणात अधिक भर पडेल, त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, असा प्रस्ताव मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये लोकसभेत मांडला. तो स्वीकारण्यात आला असून आज सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात पांडव कालीन प्राचीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा आहे. या गुंफा पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यंटकांबरोबरच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पर्यटकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु या दोन्ही गुंफाची देखभाल व संवर्धन करण्यात न आल्याने दोन्ही गुंफा जीर्ण अवस्थेत आहे. या दोन्ही गुंफाच्यावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत यात काही प्रमाणात वाढही होत आहे. येथिल झोपड्यांचा पुनर्विकास करून चांगली पक्की घरे देणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पांडवकालीन गुंफेच्या सौदर्यालाही बाधा पोहचत आहे.येथील जयंत चाळ, ब्राह्मण पुष्पकर्ण चाळ आदि चाळींच्या पुनर्विकास गेलीअनेक वर्ष रखडला असून, तो मार्गी लवणेही अत्यंत गरजेचे आहे.

या दोन्ही गुंफेचे संवर्धन व देखभाल करण्यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये विषय सभागृहात निवेदनाद्वारे मांडून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात खासदार वायकर यांनी प्राचीन पांडावकालीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफेची देखभाल व संवर्धन करण्यात यावे. तसेच या गुंफेच्या परिसरातील झोपडीधारकांना मूलभूत सुविधानी युक्त चांगली पक्की घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी निवेदनाद्वारे केली असून हे निवेदन सभागृहात स्वीकारण्यात आले असून ते आज पटलावर ठेवण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *