कोल्हापूर जिल्हास्तरीय गुणी जनरत्न जीवनगौरव पुरस्कार चोकाक गावचे शितल कांबळे यांना जाहीर

कोल्हापूर जिल्हास्तरीय गुणी जनरत्न जीवनगौरव पुरस्कार चोकाक गावचे शितल कांबळे यांना जाहीर

कोल्हापूर जिल्हास्तरीय गुणी जनरत्न जीवनगौरव पुरस्कार चोकाक गावचे शितल कांबळे यांना जाहीर
हातकलंगले तालुक्यातील चोकाक हे गाव कमी लोकसंख्या असणारे गाव आहे गावातील लोकसंख्या अंदाजे 4000 इतकी आहे येथे वास्तव्य असलेले शितल अर्जुन कांबळे हा अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपले उदरनिर्वाह चालवतो परंतु आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने त्याला सामाजिक कामाची आवड लागली तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक शैक्षणिक आर्थिक समस्या तळागाळातील लोकांची जाणीवपूर्वक सोडवणूक करत असे ते सामाजिक काम करताना त्याने अनेक उपक्रम आपल्या गावामध्ये राबविले त्यामध्ये शाळेतील गरजू मुलांना वाया वाटप वृक्षारोपण करणे आरोग्य शिबिर वृद्धाश्रमांना फळे वाटप व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देणे व त्याची माहिती सर्व सामान्य गरजू स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याचे लाभ मिळवून देणे समाजामध्ये हे कामे करत असताना तेथील लोकांमध्ये एकोपा ठेवायचे काम तो अगदी प्रेमाने करत आपल्यामुळे कोणत्याही समाजातील युवावर्ग किंवा महिला वयोवृद्ध माणसे यांना कधीही त्रास होता कामा नये कोणावर अन्याय झाला तरी कोण बरोबर चूक कुणाची आहे लक्षात घेऊन त्याच्या बाजूने खंबीरपणे तो उभे राहतो या कार्याची दखल घेऊन सन 2024 चा युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा गुणी रत्न जीवन गौरव पुरस्कार येत्या रविवारी दिनांक 18 /12/ 2024 ही रोजी स्वर्गवासी पांडुरंग दादोबा माने सांस्कृतिक भवन दत्त मंदिर जवळ फुलेवाडी कोल्हापूर येथे देण्यात येणार आहे हा पुरस्कार आपल्या शीतलला जाहीर झालेला कळताच गावातील युवा वर्ग महिला वयोवृद्ध यांना शितलचा अभिमान वाटू लागला आहे शितल तू उत्तम भरारी घे असे काही लोकांचे म्हणणे आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *