
जालना जिल्हा प्रतिनिधी : विलास मस्के ( उपसंपादक संघर्षनायक मीडिया स)
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे अवैध (वाळू )रेती उपसा रात्रंदिवस उपसा चालूच आहे
स्थानिक जिल्हा महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ अवैद्य वाळू रेती उत्खननबंद करावे अन्यथा आंबेडकरी जनमंचाच्यावतीने गोरी गंधारी नदी पात्रात बसून अमरण उपोषण करण्यात येण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा मगरे यांनी संघर्षनायक मीडिजा जालना जिल्हा प्रतिनिधी शी बोलताना सांगितले .
अंबड तालुक्यातील उपसा करणाऱ्या गावाची नावे गोंदी पाथरवाला ,पाथरवाला बंधारा शहागड बंधारा , कुरण गोरी गंधारी ‘डोमलगाव साष्ट , पिंपळगाव, आपेगाव ,बळेगाव ह्या परिसरामधून चालू आहे . गेली एक महिन्यापासून वाळू माफियांचा धुमाकूळ चालू आहे . कुठल्याच प्रकारची कारवाईमहसूल प्रशासन करताना दिसत नाही . गोदावरी पात्रातून उपसा करून पाण्याची पातळी कमी झाल्याने जलचर प्राणी वृत्त असे झाले आहेत तर पाण्याला विशिष्ट प्रकारचा रंग घेऊन उग्र वास येत आहे ह्या परिसरामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे .वाळू उपसा तात्काळ बंद न झाल्यास आंबेडकरी जनमंच सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा मगरे हे गोरी गंधारी नदीपात्रामध्ये उपोषणाला बसणार आहे .