नवे दानवाड येथील प्रल्हाद साळुंखे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्युज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला,
दानवाड येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रल्हाद साळुंखे यांना निर्भीड पत्रकार पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
गौरवण्यात आले,
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुणे न्युज एक्सप्रेस चे मुख्य संपादक मेहबूब सर्जे खान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, डॉ आयुब शेख यांचा व इतर मान्यवरांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला,
त्या वेळी उपस्थित मोहमद गौस, इक्बाल अन्सारी, प्रमुख उपस्थिती अब्दुल कयुम अब्दुल रशीद, बंडु इंगळे, डॉ तुशार निखळजे,फिरोज मुल्ला सर, प्रबोधिनी माने, अरुण जमादार,
मुन्ना शेख, श्रीकांत कांबळे, मुरलीधर कांबळे, उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे नियोजन पुणे न्युज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सर्जे खान यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
Posted inपुणे
नवे दानवाड येथील प्रल्हाद साळुंखे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
