राजगुरूनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींची अत्याचार करून हत्या, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे परप्रांतीय स्थलांतरितापैकी समाजकंटक व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना काटेकोर देखरेखीची गरज

राजगुरूनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींची अत्याचार करून हत्या, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे परप्रांतीय स्थलांतरितापैकी समाजकंटक व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना काटेकोर देखरेखीची गरज

राजगुरूनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींची अत्याचार करून हत्या, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
परप्रांतीय स्थलांतरितापैकी समाजकंटक व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना काटेकोर देखरेखीची गरज
पुणे दि. २६ 😐 पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे ८ आणि ९ वर्षांच्या दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदरच्या घटनेची नोंद खेड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते. माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजमनास संताप आणणारी ही अत्यंत गंभीर घटना आहे. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

आरोपी एका बारमध्ये कामाला होता. त्याने हत्येनंतर मुलींचे मृतदेह रिकाम्या बॅरलमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकरणामुळे व अलिकडील काळात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर येथील स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

‘मूळात राजगुरूनगर व लगतच्या परिसरात परप्रांतियांचा लोढा अलिकडील काळात लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसत आहे. त्यात सामान्य मजुरांसोबत समाजकंटक व बेकायदेशीर धंद्यातील घटक ही येत आहेत, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा व शांतता यास बाधा निर्माण होत आहे’, असे मत या क्रूर घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर यापार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.

सदर घटनेतील आरोपीवर पॉक्सो व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलामांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात यावी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांची नोंदणी करण्यात यावी. तसेच, त्यांचा डेटाबेस तयार करण्यात यावे व त्यामध्ये आधार क्रमांक, स्थानिक व्यवस्थापनामध्ये नोकरीस असल्यास त्याबद्दलची सर्व माहिती, निवासी पत्ता इत्यादी आवश्यक माहिती संकलित करण्यात यावी. परप्रांतिय नागरिकांवर प्राधान्याने लक्ष ठेवण्यात यावे व त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेवण्यात यावी. या घटनेच्या अनुषंगाने सर्व परिस्थितीजन्य पुरावे व न्यायवैद्यकीय दस्तऐवज एकत्रित करून न्यायालयापुढे सादर करण्यात यावे.

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती प्राधान्याने करण्यात यावी. जेणेकरून, आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा होणे सुलभ जाईल. पीडित मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे व त्यांना मनोधैर्य योजनेतून यथाशक्य मदत देण्यात यावी. यानंतर कार्यवाहीचा अहवाल कृपया माझ्या कार्यालयास अवगत करण्यात यावा, अशा सूचनाही याप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *