नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे शहरानजिकच्या खेडशी येथील माहेर संस्थेमध्ये अन्नधान्य वाटप
राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत.
या वाढदिवसानिमित्त शहरानजिकच्या खेडशी येथील माहेर संस्थेमध्ये खेडशी, मिरजोळे गटातील शिवसेनेतर्फे अन्नधान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या 27 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नामदार उदय सामंत यांनी काम करत असताना नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा या सर्व क्षेत्रामध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी यांनी देखील हाच वसा सुरू ठेवला आहे.
ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच खेडशी येथील माहेर संस्थेमध्ये हे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
मिरजोळे जिल्हा परिषद गटात या धान्य वाटप कार्यक्रम करताना उपतालुकाप्रमुख भिकाजी गावडे .मिरजोळे गटाचे शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण पवार, उपविभाग प्रमुख महेंद्र (पिंट्या) साळवी तसेच खेडशी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.