दीप पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न
जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित दीप पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला अशी माहिती प्राचार्य नमिता जैन यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटवाडचे माजी सरपंच व पालक नवजीत पाटील उद्घाटक म्हणून हजर होते.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते असे प्राचार्य सौं नमिता जैन यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.सुरुवातीस विद्यार्थ्यांनी लाटी -काठी, कराटे, संगीत नृत्य अशा विविध गुणदर्शनात सहभाग नोंदवला.
किडा महोत्सवामध्ये वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक तर खो -खो, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच अशा विविध सांघिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
क्रीडा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, संदीप रायान्नावर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका विद्या मशाळकर क्रीडा शिक्षक संदीप शहारे यांनी विशेष कष्ट घेतले.
दीप पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न
