दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषात उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नरसोबावाडीमध्ये श्री दत्तगुरूंचे घेतले दर्शन
कोल्हापूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवार, दि. ०६ जानेवारी रोजी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे, अशी प्रार्थना श्री दत्तगुरूंच्या चरणी केली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
विश्वस्त मंडळाच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांचा महावस्त्र आणि दत्तगुरूंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही दत्तगुरुंना पुष्पहार आणि नैवेद्य अर्पण करून आशीर्वाद घेतले. विश्वस्त मंडळीकडून मंदिरामार्फ़त हाती घेण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेत त्यांनी त्याबाबत समाधानही व्यक्त केले.
दर्शन घेत असताना नागरिकही उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांना आवर्जून भेटत होते. यावेळी त्यांनीही सर्व भक्तमंडळींची भेट घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली.