भारतीय अंदाजपत्रकाबद्दल कॉ शंकर पुजारी यांचे कडून अपेक्षा.
भारत देशाच्या अर्थसंकल्पामध्ये यापूर्वी अनेक वर्षापासून असंघटित उद्योगातील कामगारांच्या साठी काहीही तरतूद केली जात नाही. उदाहरणार्थ या देशातील प्रचंड बेकारी त्या बेकारी मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. बजेट मधील रोजगार हमी योजनेची तरतूद दुप्पट करणे गरजेचे असून त्यामधून सध्या मिळणारी जी मजुरी आहे ती दररोज किमान 600 रुपये कष्टकऱ्यांना मिळाल्यास त्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आणि हे करणे भारत सरकारला सहज शक्य आहे.
सध्या देशातील 95% कामगार असंघटित उद्योगांमध्ये काम करतात त्यामुळे त्यांना प्रॉ फंड, पेन्शन, ई एस आय आणि किमान वेतन या योजनांचा लाभ मिळत नाही म्हणून एक जरी कामगार असला तरी राज्य कर्मचारी विमा योजना सुविधा सर्वांना मिळणे आवश्यक आहे.
असंघटित उद्योगातील कामगारांना ज्यांची साठ वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करणे आवश्यक आहे
सध्या आरोग्य विषयक कष्टकऱ्यांचा खर्च अत्यंत वाढलेला आहे त्यातच प्रचंड महागाई वाढल्यामुळे मिळणाऱ्या रोजगारावर त्याला जगणे सुद्धा अशक्य झालेले आहे म्हणूनच सार्वजनिक आरोग्यवस्था शासनाने संपूर्ण मोफत केली पाहिजे. त्यासाठी मागील वर्षीच्या अंदाजपत्रकामधील तरतुदी पेक्षा दुप्पट तरतूद आरोग्य सेवेसाठी करणे आवश्यक आहे.
हे सर्व करण्यासाठी श्रीमंत मक्तेदार उद्योगपतींच्यावर ज्यादा कर आकारण्याची आवश्यकता आहे.