माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एच.डी.
कोल्हापूर, दि. १८ (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठात पी एच डी पदवी साठी असणारा ओपन डीफेन्स वायवा या शेवटच्या टप्प्याची सांगता झाली. विद्यापीठाला प्रबंध सादर केल्यानंतर त्यावर चर्चा होते व विद्यापीठाला डॅाक्टरेट देण्यासाठी शिफारस केली जाते .
डॉ. दीपक सावंत यांनी ह्या सर्व प्रक्रियेत ॲडमीशन पासून कोवीड काळात अपेक्षित सर्व मुलाखती ॲान लाईन लेक्चरर्स ॲान लाईन परिक्षा युजीसी च्या गाईड लाईन्स प्रमाणे पुन्हा एम.फील करून परिक्षा दिल्या. त्याचा प्रबंधाचा विषय होता सोशियल – पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑफ पेंडेमिक कोविड १९
त्यांचे गाईड होते डॉ. प्रकाश पवार यापूर्वी २००९ मध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जे जे हॉस्पिटल ए केस स्टडी याविषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी प्रदान केली . आपण कोवीड काळात. वैद्यकीय व्यवसाय व राजकारण तसेच अस्तित्वात असलेले कायदे एकूण आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण व त्यातील त्रुटी , लॅाकडाऊन संचार बंदी , जनता कर्फ्यू , राज्यघटनेने दिलेला, लोकशाहीने दिलेले स्वातंत्र्य , एपिडेमिक ॲक्ट हा १२३ वर्षे जुना कायदा प्लेग मध्ये हा कायदा ब्रिटीश शासनकर्त्यानी आणला होता तो प्रचलित काळात कसाअसावा , डिझॅस्टर मॅनेजमेंट ॲक्ट हे कायदे कसे परिपूर्ण नव्हते यावर मत मांडले असे डॉ. दीपक सावंत यांनी म्हटले आहे त्याच बरोबर प्रधानमंत्री ते तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लोकांबरोबर साधलेले संवाद त्यांनी तज्ञाशी चर्चा करून दिलेल्या मार्गदर्शक सूचना या अशा काळात शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी ते महानगरपालिका आयुक्त ते ग्रामपंचायत यांचा रोल कसा असावा यांना असलेले अधिकार यावर भाष्य केले आहे. आरोग्य व्यवस्थेच्या ग्रामीण व शहरी भागातील मर्यादा व त्यात अपेंंक्षित सुधारणा ,लसीकरण यात खूप सखोल विचार मांडला आहे. पोस्ट कोवीड सामाजिक समस्या आजार ॲान लाईन शिक्षण , निवडणूक प्रक्रिया हेही विषय समाविष्ट आहेत. याची देशाच्या वरिष्ठ पातळी वर नोंद घ्यावी अशी डॉ. सावंत यांनी मांडणी केली