रेव्ह.पेत्रस सोरटे सौ.शालन सोरटे व स्तवन सोरटे यांना मास्टर ऑफ डिव्हिनिटीची पदवी प्रदान
कोल्हापूर, दि. २१ (प्रतिनिधी) कोल्हापूर चर्च कौन्सिल संचलित रेव्ह.सुगंध -सुमंत मेमोरियल चर्च नेबापूर,तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर चे मॉडरेटर रेव्ह. पेत्रस सुबराव सोरटे, त्यांच्या पत्नी सौ. शालन सोरटे, मुलगा स्तवन सोरटे यांना युनियन बिब्लिकल सेमिनरी पुणे यांच्याकडून एम. डिव्ह . (मास्टर ऑफ डिव्हिनिटी ही ईश्वर विज्ञानाची पदवी दि. १५ मार्च रोजी डॉ.रेव्ह. विजयेश लाला बोर्ड चेअरमन युनियन पब्लिकन सेमिनरी, डॉ. डबल्यू. एस. ॲनी प्राचार्य युनियन पब्लिकन सेमिनरी पुणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. सोरटे कुटुंब २०१९ पासून या पदवीचा अभ्यास करत होते. अनेक समस्या, आर्थिक अडचणीवर मात करून त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना युनियन,बिब्लीकल सेमिनरी चे सर्व प्राध्यापक तसेच कोल्हापूर चर्च कौन्सिलचे माजी सेक्रेटरी रेव्ह. जगन्नाथ हिरवे (पाळक) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच कोल्हापूर चर्च कौन्सिल सुवार्ता प्रसार कमिटीचे चेअरमन रेव्ह.संजय धनवडे (पाळक) , सौ. जीवनलता कच्चप पुणे, यांचे सहकार्य मिळाले. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी एकाच वेळी पदवी मिळविल्याने त्यांच्यावर ख्रिस्ती समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे . याप्रसंगी डॉ. रेव्ह. लिमा तुला लोंगकुमार रजिस्टार, सिनेट सेरामपूर, युनियन बिब्लिकन सेमिनारचे सर्व प्राध्यापक वृंद कर्मचारी वर्ग बी. टी. एच., एम. टी. एच.,बी. डी. एम. डिव्ह. चे विद्यार्थी, मनोरमा सोरटे, राहॆल सोरटे , पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.