डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय पातळीवरील’इनोव्हेट 2k25’चे आयोजन
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे.मगदूम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील ‘इनोव्हेट 2k25 ‘(प्रॉब्लेम स्टेटमेंट कॉम्पिटिशन) चे आयोजन २९ मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ मूलगुंद यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधनात्मक दृष्टीकोनामध्ये वाढ होऊन देशपातळीवर नवीन संशोधनाने जन्म घ्यावा,असा ह्या स्पर्धेचा उद्देश असून गेले पाच वर्ष मगदूम कॉलेज अशा इव्हेंटचे यशस्वीरित्या आयोजित करत आहे.असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनहि त्यांनी केले.
या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन प्रथम फेरी क्वीज राऊंड, दुसरी फेरी आयडिया प्रेझेंट करण्यासाठी आहे व तिसऱ्या आणि अंतिम फेरीत ऑन पेपर आयडिया चे सादरीकरण पाहून परीक्षण केले जाणार आहे. असे या स्पर्धेचे स्वरूप डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन, रील मेकिंग, इ फुटबॉल (गेमिंग) स्पर्धेचे आयोजन केले आहे.अशी माहिती महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. डी. बी. देसाई यांनी दिली.
सदर कॉम्पिटिशन देश पातळीवरील सर्व डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी व इतर विद्यार्थ्यांच्या साठी सुद्धा खुली असून ,प्रवेश फी प्रत्येकी रू.७५ ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी तीन विद्यार्थी प्रति टीम आपला सहभाग ऑनलाइन, ऑफलाइन,व स्पॉट रजिस्ट्रेशने नोंदवू शकतात.या कॉम्पिटिशन साठी हजारो रुपयांची रोख बक्षिसे असून सर्वाधिक विजेते असलेल्या महाविद्यालयाला फिरता चषक व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा सिव्हील, मेकॅनिकल , कॉप्यूटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या चार विभागामध्ये घेण्यात येणार आहे. सदर शाखांचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात असे आयोजकांचे कडून घोषित करण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ.जे जे मगदूम ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे , डिन आर. अँड डी. यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थी काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदीसाठी www.jjmcoe.ac. in या महाविद्यालयीन संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
Posted inकोल्हापूर
डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय पातळीवरील’इनोव्हेट 2k25’चे आयोजन
