रिलायंस मॉल कोल्हापूर येथे गुढी पाडवा उत्साहात साजरा
कोल्हापूर, दि. २९ ( प्रतिनिधी : अमोल कुरणे) लक्ष्मीपुरी येथील रिलायंस मॉल येथे गुढी पाडवा सण उत्साहात आणि आनंदात महिलांसोबत साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमा मध्ये मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि खेळांचा समावेश होता. विजेत्यांना गिफ्ट कार्ड्स देण्यात आली.
याप्रसंगी लगोरी फाउंडेशनच्या सौ. शुभांगी साखरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवयानी गायकवाड यांनी उत्तम प्रकारे केले.
यावेळी दीडशे हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.
सर्वांनी रिलायन्स मॉलच्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.