फोटो कॅप्शन – महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना ॲॅड. धनंजय पठाडे, फॉरेस्ट ऑफिसर रमेश कांबळे, अमोल कुरणे आदी.
कोल्हापूर, दि. ११ (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ॲड. धनंजय पठाडे, फॉरेस्ट ऑफिसर रमेश कांबळे व मान्यवरांच्या हस्ते ऐतिहासिक बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचून महात्मा फुलेंनी स्त्रियांना स्वाभिमानाची शिकवण दिली व स्वावलंबी बनवले असे मनोगत ॲड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी सी पी आर हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख, एक्साईज इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर संजीवकुमार झाडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, फॉरेस्ट ऑफिसर रमेश कांबळे,
सर्वधर्मीय जयंती समितीचे आयोजक अमोल कुरणे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सर्वधर्मीय जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडितराव चौगुले, उपाध्यक्ष सतीश रास्ते, सचिव प्रशांत अवघडे, सकल मराठाचे निवासराव सूर्यवंशी, राष्ट्रीय खेळाडू डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, गौतम माने, वंदे भारत फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दिंडे, राज कुरणे, प्रा. आंनद भोजने आदी उपस्थित होते.