चोकाक येथे महामानवास अभिवादन
हातकणंगले तालुक्यातील चोकाक
येथील संयुक्त माळवाडी यांच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती पुतळ्यास पुष्प अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लडकी बहीण योजनेचे तसेच शिवसेना उप जिल्हा प्रमुख डॉ अविनाश जी बनगे, सरपंच सुनील चोकाककर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्प हार करण्यात आला, यावेळी रात्रीचे बारा वाजनेच्या सुमारास हा सोहळा अगदी नयनरम्य वातावरणात जय भीम च्या गजरात, तसेच आकर्षक विद्युत रोशनाई आणि डी जे च्या ठेक्यात पार पडला, यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य हर्षदकुमार कांबळे, यूवा नेते अभय बनगे, विकास चव्हाण, सुहास मोरे, शहाजी कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सुकुमार कांबळे, ऋषभ ढाले, संकेत कांबळे, रोहित कांबळे, वैभव कांबळे, अनिकेत कांबळे, उमेश कांबळे, डॅनी कांबळे, भूषण चोकाककर, पत्रकार शीतल कांबळे, पत्रकार आजित शिंदे, तसेच संयुक्त माळवाडी ग्रुप चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य गावातील नागरिक व भीम अनुयायी, आणि महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.