स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले, अमोल कुरणे आदी.
कोल्हापूर, दि. १४ (प्रतिनिधी) खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले, यांच्या हस्ते ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज देश एकसंघ असून , भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू असल्याचे मनोगत प्रा. आंनद भोजने यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी गोकुळ दूध संघा तर्फे सर्वधर्मीय जयंती समिती च्या वतीने मोफत सुगंधी दूध वाटप करण्यात आले.
यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, सर्वधर्मीय जयंती समितीचे आयोजक अमोल कुरणे, निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने, प्रा. आंनद भोजने, समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, सकल मराठाचे निवासराव सूर्यवंशी, अंबाबाई मंदिर परिसरातील खेळणी विक्रेते अंध पती-पत्नी आशा कांबळे, जयपाल कांबळे, पंडितराव चौगुले, राष्ट्रीय खेळाडू डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, प्रशांत अवघडे, सतीश रास्ते, राज कुरणे आदी उपस्थित होते.