महात्मा बसवेश्वर जयंती सर्वधर्मीय समिती तर्फे उत्साहात साजरी
कोल्हापूर,दि.३० (प्रतिनिधी) सी.पी.आर.चौकामध्ये जगद्गुरु महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस कोल्हापूर एम.आय.डी.सी.चे कार्यकारी अभियंता आय.ए.नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सत्य, अहिंसा आणि समानतेचा मार्ग दाखवणारी क्रांतिकारी साहित्य वचने बसवेश्वरांनी लिहिली. महात्मा बसवेश्वरांनी दाखवलेली समतेची वाट आजही आपल्याला दिशा दाखवते.
बसवण्णा समाजसुधारणेचे दिपस्तंभ असून, त्यांची वचने म्हणजे जीवनातील मार्गदर्शकतत्वे आहेत असे मनोगत पंडितराव चौगुले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी सर्वधर्मीय समितीचे आयोजक अमोल कुरणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, उपाध्यक्ष सतीश रास्ते, सचिव प्रशांत अवघडे, जीवन आधार चे संस्थापक शंकर पोवार, बार्टीच्या आशा रावण, वंदे भारत संस्थेचे संस्थापक चंद्रकांत दिंडे, शिवाजीराव परळीकर, चंद्रकांत काळे, अर्जुन बुचडे आदी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी भोजन वाटप
करण्यात आले.