जनहित फाउंडेशनचे कार्य सिमांत व्यक्तीला सन्मान देणारे – संतोष आठवले ; मुंबई दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

जनहित फाउंडेशनचे कार्य सिमांत व्यक्तीला सन्मान देणारे – संतोष आठवले ; मुंबई दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

मुंबई : जनहित फाउंडेशनचे कार्य सिमांत व्यक्तीला सन्मान देणारे असून क्रांती घडविण्याचे सामर्थ असणाऱ्या कर्तबगार व्यक्तीचा सन्मान म्हणजे समाजाला आदर्शवत आहे असे प्रतिपादन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले यांनी केले .
जनहित फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ अखिल भारतीय किर्तन संस्थेच्या मांगल्य सभागृह दादर मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला .
संतोष एस आठवले हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते . आठवले पुढे म्हणाले जनहित फाउंडेशन चे कार्य सामान्य माणसाला निर्भय बनवण्याचे आहे . भारतीय लोकशाही व संविधान रक्षणाचे काम हि संस्था करत आहे त्याचे सामाजिक , शैक्षणिक संस्कृतीक क्षेत्राबरोबर बेरोजगार व्यक्तीना रोजगार मिळवून देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम आंदकवादी हल्ल्यात मुत्यु झालेल्या नागरीकांना काही वेळ मौन राहुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

यावेळी निवृत्त पोलिस आयुक्त अजित देशमुख , डॉ ऋजुता ओमप्रकाश दुबे , सुप्रसिद्ध गायिका व संगितकार सौ मधुवंती पेठे व ज्येष्ट समाजसेवक राजेंद्र लकेश्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर नवे दानवाड गावचे लोक नियुक्त सरपंच डॉ सी डी पाटील ( कोल्हापुर ) , उद्योजक बी . ए पाटील ( चिंचवड ), ज्येष्ट पत्रकार डॉ दगडू श्रीपती माने (कोल्हापुर ) , पत्रकार सिद्धार्थ तायडे ( बुलढ़ाना ) विद्यार्थीनी आंदोलन अक्षरा वाठोरे (पुणे ) , सेनापती भोसले सर ,मच्छिंद्र रुईकर , संजय कांबळे , नितेश दिक्षांत , राजु मोमीन , प्रमोद आप्पासाहेब माने , भिमराव कांबळ , सदाशिव घाडीगांवकर , सौ पद्मा मंगेश जाधव, मिस जॉर्जिआ सिकवेरा , रविंद्र खांडेकर अनिकेत पानसरे गिरिश तुळपुळे बाळु साळवे सतिश कुलकर्णी , सौ मेघा पानसरे, डॉ . समीरा एस. भारती ,विलास राऊत ,नारायण गिरप ,अश्विनी भंडारे ,देवता मैत्री , संजय ननावरे ,प्राची नाईक , सुनिता थोकरे , राजश्री ठाकुर , मिलिंद जाधव , शाहिद मुल्ला , प्रमोद तरळ , जादूगार श्रीधर किर, सुनिल बागुल , बबन जोशी , सौ संजना पाटील, आदीना राज्यस्तरीय समाजरत्न , समाजभुषण पुरस्काराने मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले . स्वागत प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ट पत्रकार उमेश जामसंडेका यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ इंदुमती पेठे यांनी केले तर आभार महेंद्र वाघमारे यांनी मानले .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *