डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल

डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल

डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल

चोपडा … अनिलकुमार पालीवाल,याजकडून……क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडविणाऱ्या डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांना इतिहास आणि पुरातत्व संशोधन संस्था, संग्रहालय, बालाघाट ( मध्य प्रदेश) यांच्या वतीने क्रिकेटच्या सर्वच प्रांतात उल्लेखनीय कार्यासाठी डि.लिट (डॉक्टरेट इन लिटरेचर) हि मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. यापूर्वी सन २०२० मध्ये क्रिकेट मधीलच उत्कृष्ठ कार्यासाठी अमेरिकेच्या ग्लोबल पिस युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले होते.
क्रिकेट हा मुख्य विषय घेऊन सावित्रीबाई फुले विद्यापिठातून पदवी घेतलेले दत्ता विघावे पंच म्हणून नावारूपाला आले. मुले, मुली, महिला, पुरूष, अंध, अपंग यांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करणारे डॉ. दत्ता विघावे यांना सन २०१४ मध्ये नेपाळ (पोखरा) येथे झालेल्या इंडो नेपाळ तिरंगी स्पर्धेत उत्कृष्ट पंचगिरीसाठी सुवर्णपदक मिळाले आहे. स्वतःचा मुलगा ऋषिकेश विघावे यांच्यासह महाराष्ट्र क्रिडा महा संचलनालय व जिल्हा क्रिकेट परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १४, १७ व १९ वयोगटातील स्पर्धेत सलग ३२ सामन्यात पंचगिरी केली. हा क्रिकेटच्या आठशे वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कोणत्याही पितापुत्रांनी केलेला विश्वविक्रम असून ओएमजी वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये याची नोंद झाली आहे.
भारत हा जागतिक क्रिकेटची नुसतीच महासत्ता नाही तर क्रिकेटचा मुख्य आश्रयदाताही आहे. भारतात क्रिकेटपटू मोठ्या संख्येने तयार होतात परंतु थँकलेस जॉब असलेल्या अंपायरींगकडे वळायला फारसे कोणी धजावत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅनेलवर भारतीय पंचांची वाणवा आहे, ती टाळण्यासाठी डॉ. दत्ता विघावे यांनी ” विघावेज क्रिकेट अंपायरींग अकॅडमी ” सुरू केली. सोबत स्कोअरर आणि कॉमेंटेटर्स यांचेही प्रशिक्षण वर्गही सुरु केले.
क्रिकेट प्रशिक्षक म्हणून प्रवरा एज्युकेशन सोसायटी, प्रवरानगर येथून सुरुवात करताना अल्पावधीतच त्या संस्थेत क्रिकेट विभागाचं प्रमुख पदही मिळविलं. त्यानंतर सुप्रसिद्ध क्रिकेट संकुल आत्मा मलिक क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षक म्हणून कार्य केले. तर सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण व इरफान पठाण यांच्या ” कॅप ” या श्रीरामपूरस्थित क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षक म्हणून सेवा दिली. अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत असताना सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू झहीरखान यांनाही शालेय स्तरावर क्रिकेट प्रशिक्षण देण्याचं भाग्य डॉ. विघावे यांना लाभलं आहे.
देशाच्या ग्रामीण भागातील गुणवान व प्रतिभावंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव येण्यासाठी परदेशात नेऊन क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळवून देणारे दौरेही घडविले आहेत.
क्रिकेटचं अभ्यासपूर्ण, सडेतोड आणि मार्मिक विश्लेषण व समिक्षण करण्यात डॉ. दत्ता विघावे यांचा हातखंडा आहे. क्रिकेट समिक्षक म्हणून आजतागायत तेरा हजारांपेक्षा जास्त लेख विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, प्रसारमाध्यमे, ऑनलाईन ब्लॉग्ज व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहेत. आजही विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे चालू राष्ट्रीय – आंतराष्ट्रीय घडामोडी, स्पर्धा, लिग विषयी लिखान प्रसिद्ध होत असून जगभर लाखो वाचक त्यांचे लेख वाचत असतात.
क्रिकेट एक्सपर्ट म्हणून आकाशवाणीवर श्रोत्यांच्या लाईव्ह प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात सहभाग. विविध टिव्ही वाहिन्यांवरही एक्स्पर्ट म्हणून भूमिका बजावली.
डॉ विघावे हे केवळ क्रिकेटच नाही तर शिक्षण, साहित्य, पत्रकारीता, पर्यावरण, समाजसेवा, कला व सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत असून पाच विश्वविक्रमांचे ते धनी आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *